Wednesday 6 March 2024

जालना जिल्हा एक विध खेळ संघटनांनी ग्रेस गुणाबाबत कागदपत्रे सादर करावेत

 

 

जालना, दि. 6 (जिमाका) :-  सन 2023-24 मधील क्रीडा गुण सवलतीकरीता पात्र एकविध खेळांच्या संघटना निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आवश्‍़यक कागदपत्रामुळे क्रीडा गुण सवलतीपासुन आपल्या एकविध खेळ संघटनाकडून आयोजित स्‍़पर्धामधील सहभागी खेळाडू वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्‍़यावी, तसेच कागदपत्रे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 20 मार्च, 2024 पर्यंत सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णयान्वये इयत्‍़ता दहावी व बारावीमध्‍़ये शिकत असलेल्या जिल्हा,  विभाग,राज्‍़य, राष्‍़ट्र्रीय तसेच आंतरराष्‍़ट्रीय स्‍़तरावर सहभागी होऊन प्राविण्‍़य मिळविलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांची सवलत देण्याची सुधारीत कार्य पध्‍़दती निश्चित केलेली आहे. सन 2018-19 या शालेय वर्षापासून सुधारीत नियमावलीनुसार क्रीडा गुण सवलत देण्यात येत आहे.

सुधारित शासन निर्णयामधील परिशिष्‍़ठ 5 मध्‍़ये एकविध खेळांच्या राज्य़ संघटनेने क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावयाच्या स्‍़पर्धा विषयक कागदपत्रांची यादी नमुद केलेली आहे. त्या़नुसार संबंधित खेळ संघटनांनी विविध स्तरावर पार पडलेल्या स्प़र्धांचे रेकॉर्ड तथा अभिलेख क्रीडा व युवक सेवा संचालनालयाबरोबरच राज्य़ातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर करणे आवश्य़क आहे.  बऱ्याच एकविध खेळ राज्य़ संघटनाद्वारा संबंधित स्प़र्धांचे रेकॉर्ड फक्त़ क्रीडा व युवक सेवासंचालनालय व जिल्हा़ क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर केले जात नसल्याने संबंधित खेळातील खेळाडूंचे प्रस्त़ाव प्राप्त़ होऊनही त्यांना क्रीडा गुणांची शिफारस करणे शक्य़ होत नाही. त्यामुळे अनेक खेळाडू क्रीडा गुण सवलतीस पात्र असूनही त्यापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास येत असून सदरची बाबही क्रीडा विकासासमोर ठरणारी आहे. शासन निर्णयामधील यादीमधील नमुद 47 खेळ प्रकारांच्या एकविध खेळ राज्य़ संघटनांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीयस्त़रावरील विविध स्पर्धाविषयक अभिलेखे क्रीडा व युवक सेवासंचालनालय तसेच राज्यातील 36 जिल्ह़ा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे. अधिकच्या माहितीकरीता क्रीडा विभागाच्या रेखा परदेशी यांना (मो.9022951924) संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment