Monday 11 March 2024

बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन

 


जालना, दि. 11 (जिमाका) :-  नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना यांचे मार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना  येथे बुधवार दि. 13 मार्च 2024 रोजी सकाळी 11 ते दु. 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजकरण्यात आले आहे. तरी या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट कॉ-ऑपरेटीव सोसायटी लिमिटेड जालन.यांची एम.कॉम / एम.ए.पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ब्रँच अधिकारी/ बँक व्यवस्थापकासाठी 1 पद, कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सहायक/क्लार्कची 02 पदे, दहावी/बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिपाई साठी 1 पद आहे. तसेच स्वतंत्र मायक्रोफिन प्रा.लिमिटेड जालना यांची दहावी/बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी फिल्ड ऑफिसर/रिलेशन ऑफिसरचे 100 पदे तसेच कलेक्शन ऑफिसरची 50 पदे असे एकूण 154 पदाकरीता मागणीपत्र प्राप्त झाले असून नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या  प्रत्यक्ष  मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.

           जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in त्याचप्रमाणे www.ncs.gov.in  या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेजवरील नोकरी साधक लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर-18 (2023-24) जालना याची निवड करावी. उद्योजक, नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. किवा ऑनलाईन सहभाग नोंदवला नसला तरी कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ.कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून दि. 13 मार्च 2024 रोजी सकाळी 11 ते दु. 2 प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना येथे उपस्थित रहावे, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment