Thursday 21 March 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये, शैक्षणिक संस्‍था, सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास निर्बंध

 


जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर घालण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेशाद्वारे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment