Monday 11 March 2024

केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी 12 मार्चला जालना दौऱ्यावर

 

जालना, दि. 11 (जिमाका) :-  केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे दि. 12 मार्च 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार, दि.12 मार्च 2024 रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरुन  हेलिकॉप्टरने दरेगाव हेलीपॅड, जालना येथे आगमन,  सकाळी 9 ते 10 या वेळेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गती शक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनलचे दूरदृश्य प्रणालीव्दारे होणाऱ्या  लोकार्पण     समारंभास उपस्थिती. सकाळी 10 वा. मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्कचा एलओए जारी केला जाईल.  तसेच सकाळी 11 वाजता दरेगाव हेलिपॅड येथून प्रयाण करतील.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment