Wednesday 13 March 2024

आपत्ती व्यवस्थापनासाठी शासनाकडून प्राप्त टेंटचे (तात्‍पुरता निवारा केंद्र) प्रात्यक्षिक व प्रशिक्षण संपन्न

 





 

जालना, दि. १३ (जिमाका) - राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, मंत्रालय मुंबई यांच्याकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त पोर्टेबल टेंट (तात्‍पुरता निवारा केंद्र) चे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्‍ण पांचाळ यांचे सूचनेवरून तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरात  येथे आज संपन्न झाले.

सदर प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्‍हाधिकारी सोहम वायाळ, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी दिपक काजळकर, मनपा जालना अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, अग्निशमन विभाग, भोकरदनचे भुष पळसपगार यासह अग्निशमन विभाग, जालना, भोकरदन, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी, तिर्थपूरी येथील कर्मचारी उपस्थित होते.

प्रशिक्षणांतर्गत अजितकुमार पांडे,  सागर मोरे (पुरवठादार यांचे प्रतिनिधी) यांनी राज्य शासनाकडून आपत्कालीन परिस्थितीत वापराकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास प्राप्त झालेले पोर्टेबल टेंट (तात्‍पुरता निवारा केंद्र) कशाप्रकारे तयार करावेत, याचा वापर कसा करावा, ट्रान्सपोर्ट कसा करावा, त्याचबरोबर त्यासाठी प्रिकॉशनरी उपाय कोणते आवश्यक आहेत, या तंबूची साठवणूक व देखभाल कशी करावी ई. विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदरील टेंट वजनाने हलके असल्यामुळे एका जागेवरून दुस-या जागेवर उचलुन नेण्यास सोईस्कर आहेत. तसेच अगदी १०-१५ मिनीटात हे टेंट उभारले जातात. शिवाय हे टेंट वाटर प्रुफ आहेत. उक्‍त साहित्‍यांचा आपत्‍कालीन परिस्थितीत उपयोग होणार आहे.

सदर प्राप्‍त पोर्टेबल टेंट (तात्‍पुरता निवारा केंद्र) हे जालना शहर मनपा अग्निशमन विभाग, तसेच तालुकास्‍तरावरील अग्निशमन विभाग, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी व तिर्थपूरी यांना वितरीत करण्‍यात आले.

त्‍याचप्रमाणे राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, मंत्रालय मुंबई यांचे कडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास रेस्‍क्यु शिट प्राप्‍त झाले असुन सदर शिटचा उपयोग आगीमध्‍ये भाजलेल्‍या व्‍यक्‍तींना सुरक्षित स्‍थळी हलवीणे साठी होणार आहे. सदर शिट जालना शहर मनपा अग्निशमन विभाग, तसेच तालुकास्‍तरावरील अग्निशमन विभाग, भोकरदन, परतूर, मंठा, अंबड यांना वितरीत करण्‍यात आले आहेत.

                                                        -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment