Monday 4 March 2024

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची प्रशिक्षण योजना विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 


 

       जालना, दि. 4 (जिमाका) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जालना कार्यालयास प्रशिक्षण योजनेचे 267 चे उद्दिष्ट मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी रोजगार स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत या करिता सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता उद्दिष्ट प्राप्त झालेले आहेत.

     जिल्हयातील मातंग समाज बांधव व तत्सम 12 पोटजाती मधील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पात्रतेसाठी निकष व अटी खालील प्रमाणे आहे. प्रशिक्षणार्थी मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीतील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा प्रशिक्षणार्थीने आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा इत्यादी.

       मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीतील ज्या विद्यार्थ्यास प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. अशा विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शैक्षणिक दाखला/ टि सी, आधार कार्ड/मतदान कार्ड ,राशन कार्ड, सपोर्ट साईज फोटो दोन, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रासह दि. 6 मार्च 2024  ते 28 मार्च 2024 कालावधीत विहीत नमुन्यात अर्जासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्ज करावे प्रशिक्षण विद्या वेतनासाठी विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयातून विनामुल्य मिळेल,दि. 28 मार्च 2024 नंतर कोणतेही प्रशिक्षणाचे अर्ज चकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्हि. एस. सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment