Wednesday 6 March 2024

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत विभागस्तरीय तपासणी समितीकडून जिल्ह्यातील सिंधी पिंपळगाव व वालसा खालसा गावाची पाहणी

 









 

         जालना, दि. 6 (जिमाका) :-  ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अधिक परिणामकारकपणे राबवून ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यत पोहचविणे आवश्यक असल्याबाबत राज्य शासनाने सुधारीत मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक सिंधी पिंपळगाव व द्वितीय क्रमांक भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा या गावाने पटकाविला आहे. या दोन्ही गावांनी  विभागस्तरीय स्पर्धेत भाग घेतला असल्याने या दोन ग्रामपंचायतीची तपासणी करण्यासाठी विभागस्तरीय  समितीकडून या गावांची आज पाहणी करण्यात येवून निरीक्षणे नोंदविण्यात आली.

विभागस्तरीय तपासणी समिती पथकात विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त (विकास) तथा विभागस्तरीय तपासणी समितीचे सदस्य सचिव डॉ. सिमा जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती कवडदेवी, विभागीय आयुक्त कार्यालयातील कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे दिलीप घुंबरे, गटविकास अधिकारी विष्णू बोडके, विस्तार अधिकारी पी. डब्ल्यु. सोनवणे व आर.डी. झिने, जनसंपर्क अधिकारी भगवान तायड, मुल्यमापन व सनियंत्रण तज्ज्ञ हिमांशू कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

विभागस्तरीय तपासणी समिती पथकाकडून जिल्ह्यातील सिंधी पिंपळगाव व वालसा खालसा या गावाची पाहणी करण्यात आली. यामध्ये ग्रामस्तरावर राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शाळा, अंगणवाडी,  ग्रामपंचायत कार्यालय व त्याअंतर्गत पाणीपट्टी वसूली, घरपट्टी वसूली,  सार्वजनिक सभागृह, पाणी आराखडा,  ग्रामपंचायतीचे लेखा, विविध उपक्रम,  पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, भुमिगत गटारे, सांडपाणी व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधांची व गावातील रस्त्यांची पाहणी, गाव व गाव परिसरात करण्यात आलेल्या लोकसहभागातील विकासकामे, वृक्ष लागवड, सार्वजनिक स्वच्छता गृह, घनकचरा व्यवस्थापन आदी विषयक तपासणी करण्यात आली.  यावेळी संबंधित गावच्या सरपंच सुमित्रा भानुदास जाधव, सरपंच कु.अंजली वैजनाथ सिरसाट,  ग्रामविकास अधिकारी यांच्यासह संबंधित केंद्र प्रमुख, आरोग्य संचालक, अंगणवाडी सुपरवायझर व गावच्या ग्रामस्थांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment