Wednesday 13 March 2024

जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम संपन्न

 


जालना, दि. 13 (जिमाका) :- नेहरू युवा केंद्र, जालनाच्या वतीने जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर हे होते. तर उदघाटक म्हणून माजी उपनगराध्यक्ष भास्कर दानवे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. केसकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य प्रवीणकुमार उखळीकर, निदेशक सुधीर कापसे, धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत, सहारा संस्थेचे अध्यक्ष बी. एस. सय्यद, यशदाचे मास्टर ट्रेनर राधेश्याम राजपूत, युवा संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड, सामाजिक कार्यकर्ते  सिद्धिविनायक मुळे, माजी पंचायत समिती सदस्य़ वसंत शिंदे, रेखा परदेशी, उप-प्राचार्य रजनी शेळके, प्रा.राजेंद्र भोसले, शाहीर उषाताई कावळे आणि संच प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व दीपप्रज्वललाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी लोकरंग कलामंचाने व्यस़नमुक्ती, मतदार जागरुकता व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची रंग वाढविले. या कार्यक्रमात व्होकल फॉर लोकल या विषयांवर श्री. उखळीकर यांनी तर माय भारत युवा भारत या विषयांवर मिलिंद सावंत यांनी तर नारी शक्ती या विषयावर राधेश्याम राजपुत यांची व्याख्याने झाली. तदनंतर लोकसभेतील कामकाजाचे प्रात्याक्षिक प्रारुप युवा संसदेत लोकसभा अध्यक्ष वैभव कांगणे, पंतप्रधान हर्षल व्य़वहारे,  गृहमंत्री भारत शेळके, अर्थमंत्री अनिकेत जगदाळे, क्रिडामंत्री आदित्य़ देशमुख, रेल्वे मंत्री सचिन ढोले, शिक्षण मंत्री राजु वाघमारे, पर्यावरण मंत्री वैभवी जगताप, महिला व बालकल्याण मंत्री भारती राठोड, कृषी मंत्री दिपाली अंबडकर, सामाजिक न्याय मंत्री आकाश आढे, विरोधी पक्ष नेते योगेश खोशे, संसद सदस्य़ भारत तिडके, सागर मगरे, अक्षय दंडाई, बाळु काळे  यासह लोकसभा सचिवालयाचे कर्मचारी म्हणुन व मार्शल म्हणुन सोमेश गिरी, प्रथम सावंत, रोहन राठोड, सुधीर चव्हाण, गिता राठोड, शुभम फुके, निवृत्ती गवळी, यशोधन सराटे यांनी भुमिका निभावल्या तर लोकरंग कलामंचच्या शाहीर उषाताई कावळे, जनार्धन ठावस, नितीन कावळे, पांडुरंग ठराळकर, गणपत ठोंबरे, सचिन मोकासरे, अनिल जायभाय, दिपक इंचाळ यांनी लोककलेतुन लोकप्रबोधन करुन प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक बी. एस. सय्यद़ यांनी केले. सुत्रसंचालन मिलिंद सावंत यांनी केले तर आभार जयपाल राठोड यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी केंद्र शासन पुरस्कार प्राप्त़ धरतीधन ग्रामविकास संस्था, युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सहारा सामाजिक संस्था, पदाधिकारी यांचेसह नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक, प्रिती झिने, तैय्यबा शाहा, रुखसार पठाण, रवी दळे, अजय पैठणे, शुभम शुक्ला यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवक-युवतींची उपस्थिती होती. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment