Thursday 28 September 2023

कोतवाल भरती परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांनी अंबड तहसील कार्यालयातून हस्तगत करावेत

 


जालना, दि. 28 (जिमाका) :- कोतवाल पदासाठी आवेदन पत्र भरुन परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्व परीक्षार्थींची कोतवाल निवड समिती तालुका अंबड मार्फत रिक्त असलेल्या दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी कोतवाल पदासाठी आयोजित करण्यात आलेली परिक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. तरी आता कोतवाल परीक्षा शनिवार दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत जालना येथील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोतवाल भरती परीक्षेस पात्र उमेदवारांना कोतवाल भरती परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्राचे वितरण तहसील कार्यालय, अंबड येथून करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून या कक्षामधून दि. 29 सप्टेंबरपासून कार्यालयीन वेळेत प्रवेशपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. तरी कोतवाल भरती परिक्षेकरीता अर्ज भरलेल्या सर्व पात्र उमेदवारांनी त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र तहसील कार्यालय अंबड येथून हस्तगत करावे. प्रवेशपत्र घेताना उमेदवारांनी सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन अनुज्ञप्ती, पासपोर्ट ओळखपत्र, मतदार ओळखपत्र यापैकी कोणत्याही ओळखत्राची  मुळ प्रत सोबत आणावी. असे तहसीलदार तथा तालुका निवड समिती, अंबड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

गटई कामगारांनी लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेतील त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन

 


 

          जालना दि. 28 (जिमाका) :- गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून सन 2022-23 वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने छाननी करण्यात आलेली असून पात्र व त्रुटी असलेल्या अर्जाची यादी समाज कल्याण कार्यालय,जालना येथील सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यात आलेल्या अर्जदारांनी अर्जामध्ये असलेल्या त्रुटीची पुर्तता दि. 6 ऑक्टोबर 2023 पर्यंत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                                          -*-*-*-*-

समाज कल्याण विभागाकडून 1 ऑक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे आयोजन

 


 

जालना दि. 28 (जिमाका) :- भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निदेशक तत्वावरील अनुच्छेद 39 क व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावेत अशी तरतूद आहे.  रविवार, दि. 1 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समाज कल्याण विभागाकडून आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यास जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटनांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

ज्येष्ठ नागरिक मेळाव्यामध्ये राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-2013 ची अंमलबजावणी करणेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तहाने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे तसेच शारिरीक, मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 9 जुलै, 2008 रोजीच्या शासन निर्णयन्वये निर्गमित करण्यात आली आहे. शासन निर्णयातील तरतूदीनुसार 1 ऑक्टोबर हा दिवस राज्यात "जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस" साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

जालना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 ऑक्टोबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन

 


 

जालना दि. 28 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यासाठी 12 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहून एकुण 953 रिक्त पदासाठी उमेदवारांची चाचणी व मुलाखती घेवून निवड करणार आहेत. उमेदवारांनी बायोडाटा व सर्व शैक्षणिक कागदपत्राची छायांकित प्रत सोबत बाळगावी.  तरी रोजगार मेळाव्यातील सुवर्ण संधीचा इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

Wednesday 27 September 2023

कोतवाल भरती परीक्षेचे हॉलटिकीट दि. 29 सप्टेंबर पासून तहसील कार्यालयात उपलब्ध

 


 

     जालना दि. 27 (जिमाका) :- कोतवाल निवड समिती तालुका बदनापुर मार्फत रिक्त असलेल्या कोतवाल पदासाठी दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी कोतवाल पदासाठी आयोजित करण्यात आलेली परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती.  सदर परीक्षा आता दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या वेळेत राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.

तरी परीक्षेस पात्र उमेदवारांना कोतवाल भरती परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्राचे (हॉलटीकीटचे) वितरण तहसील कार्यालय, बदनापूर येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून दि. 29 सप्टेंबर 2023 पासून कार्यालयीन वेळेत प्रवेशपत्राचे वितरण करण्यात येईल. कोतवाल भरती परिक्षेकरीता अर्ज भरलेल्या सर्व पात्र उमेदवारांनी त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र तहसील कार्यालय बदनापूर येथून हस्तगत करावे. प्रवेशपत्र घेतांना उमेदवारांनी सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस, पासपोर्ट ओळखपत्र, मतदार ओळखपत्र यापैकी एकाची मुळ प्रत आणावी. असे तालुका निवड समिती तथा तहसीलदार बदनापुर सुमन मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

7 ऑक्टोंबर रोजी कोतवाल भरती परीक्षेचे आयोजन; उमेदवारांनी तहसील कार्यालयातून प्रवेशपत्र हस्तगत करावेत

 


 

जालना, दि. 27 (जिमाका) :- कोतवाल पदासाठी आवेदन पत्र भरुन परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्व परीक्षार्थींची कोतवाल निवड समिती तालुका जालना मार्फत रिक्त असलेल्या दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी कोतवाल पदासाठी आयोजित करण्यात आलेली परिक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. तरी आता कोतवाल परीक्षा शनिवार दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत जालना येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयात आणि उर्दु उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय या दोन परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार छाया पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोतवाल भरती परीक्षेस पात्र उमेदवारांना कोतवाल भरती परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्राचे वितरण तहसील कार्यालय, जालना येथून करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून या कक्षामधून दि. 29 सप्टेंबरपासून कार्यालयीन वेळेत प्रवेशपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. तरी कोतवाल भरती परिक्षेकरीता अर्ज भरलेल्या सर्व पात्र उमेदवारांनी त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र तहसील कार्यालय जालना येथून हस्तगत करावे. प्रवेशपत्र घेताना उमेदवारांनी सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन अनुज्ञप्ती, पासपोर्ट ओळखपत्र, मतदार ओळखपत्र यापैकी कोणत्याही ओळखत्राची  मुळ प्रत सोबत आणावी. असे तहसीलदार तथा तालुका निवड समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

   

 

Tuesday 26 September 2023

दि. 4 ऑक्टोबर रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 


 

             जालना (जिमाका) दि. 26 :- मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांचे संयुक्त विद्यमाने दि. 4 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 9.00 ते 2 वाजेपर्यंत  पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात करिअर विषयक मार्गदर्शन करण्यात येणार असून दहावी,बारावी,आय.टी.आय.,बी.ए.,बी.कॉम, बी.एस सी,एम.कॉम,बी.फॉर्म, डिप्लोमा व बी.ई, डिप्लोमा  ॲग्री,बी.एस सी. ॲग्री,एम.एस.सी. ॲग्री,एम.बी.ए,एम.बी.ए,एम.एस.डब्यु इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छूक यांचेसाठी एकूण  911  रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 12  कंपन्यांचे  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.  

या मेळाव्यात शासनामार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शासकीय संस्थांचे स्टॉल्स लावण्यात येणार  आहे. तसेच  व्यवसाय इच्छुकांकरिता स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणा-या शासनाच्या विविध महामंडळांचे स्टॉल्स लावून  योजनांचे  मार्गदर्शन  करण्यात येणार आहे.           

या रोजगार मेळाव्यामध्ये एन.आर.बी. बेरिंग लि. जालना यांची 30 पदे,  विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. जालना, यांची 13 पदे, धूत ट्रान्समिशन प्रा. लि. शेंद्रा, एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर यांची 300 पदे, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स  छत्रपती संभाजीनगर यांची 200 पदे, डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि. (एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज लि. वाळूज छत्रपती संभाजीनगर) यांची 21 पदे, क्यूस कॉर्पोरेशन लि. पुणे  (फोर्स मोटर्स लि, आकुर्डी, पुणे / टाटा मोटर्स लि. पिंपरी, पुणे) यांची 200 पदे,  महिको  प्रा. लि. एमआयडीसी, जालना यांची 4 पदे,  ओम  साई मॅन पॉवर  सर्विस प्रा. लि. वाळुज MIDC,  छत्रपती संभाजीनगर यांची  50 पदे , फुलब्री टेक्स कॉम प्रा. लिमिटेड, जालना यांची 70 पदे, गिरी टेक सिस्टीम  प्रा.लिमिटेड जालना यांची  02 पदे,  कॉपी व्हिजन   इनफोर्समेंन्ट सर्विसेस प्रा. लिमिटेड जालना यांची  21 पदे , एल. जी. बी . कंपनी जालना यांची 30 पदे  अशी एकूण 941 रिक्तपदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 12 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.

 या सुवर्ण संधीचा रोजगार  इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यासाठी  विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देण्यासाठी किमान पाच प्रतीत रिझ्युमे/बायोडाटा,  शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड/सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह  सकाळी 9 वाजता उपस्थित राहून  मुलाखती द्याव्यात आणि या रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन  सहायक आयुक्त , कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.                                                

   -*-*-*-*-*-

 

जिल्हा क्रीडा संकुलचा होणार कायापालट

 


 

जालना, दि. 26 (जिमाका) :- जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलचा लवकरच कायापालट होणार असून अत्याधुनिक क्रीडा सुविधांनी हे संकुल सज्ज होणार आहे. टेनिस कोर्ट, सिंथेटिक बॉस्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी मैदान,  खो-खो मैदान, सिंथेटिक स्केटिंग रिंग, आर्टीफिशियल क्रिकेट टर्फ, जिम हॉल, 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, नॅचरल फुटबॉल मैदान, जलतरण तलाव  या सारख्या क्रीडा सुविधा  अत्याधुनिक स्वरुपात खेळाडुंसाठी क्रीडा संकुलात उपलब्ध होणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा क्रीडा संकुलाचे रुप बदलण्यासाठी विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह जिल्हा परिषद, बांधकाम, पोलीस, शिक्षण, महावितरण विभागांचे अधिकारी व वास्तुविशारदांची उपस्थित होती.

जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडुंसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्याकरीता सध्या फेज-1 अंतर्गत कामे सुरु आहेत. यामध्ये अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, टेनिस कोर्ट, सिंथेटिक बॉस्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी मैदान,  खो-खो मैदान, सिंथेटिक स्केटिंग रिंग, आर्टीफिशियल क्रिकेट टर्फ, जिम हॉल आदी कामांना सुरुवात झाली आहे. व्यायामशाळा हॉलची दुरुस्ती व रंगरगोटीचे काम प्रगतीपथावर आहे. 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, नॅचरल फुटबॉल मैदान, हॉफ  ऑलंम्पीक साईजचा जलतरण तलाव, सिंथेटिक ॲथलेंटिक पॅव्हेलियन बिल्डींग, आर्चरीज रेंज, स्टोअर रुम या कामांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सर्व कामे गुणवत्तापूर्ण  करण्यात यावीत. कुठल्याही कामांमध्ये तडजोड करु नये. कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

दरम्यान, बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी जिल्हा क्रीडा संकुलला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

***

जालना येथे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकाचे संरक्षण कायदा मार्गदर्शन शिबीर संपन्न

 


 

जालना, दि. 26 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 25 सप्टेंबर 2023  रोजी उर्दू हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय, जालना येथे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकाचे संरक्षण कायदा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहिते, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  श्रीमती प्रणिता भारसाकडे- वाघ, आणि सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रधान न्यायाधीश बाल न्याय मंडळ श्रीमती एन. ए. वानखेडे आदि उपस्थित होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मोहिते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांना समजेल अशा सोप्या शब्दात लैंगिक गुन्ह्यांपासुन बालकांचे संरक्षण कायदा अगदी सहज समजावून सांगितला. तसेच सदर कायद्यामध्ये शिक्षेचे प्रावधान आणि विद्यार्थ्यांना गुड टच आणि बँड टच याबाबत सांगितले. तसेच मुलींच्या विविध प्रश्नांबाबत एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.

प्रारंभी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती भारसाकडे-वाघ, यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगुन तसेच मंचावर उपस्थित सर्वांची ओळख करून कार्यक्रमाची सुरूवात केली. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण याविषयीची माहिती उपस्थित विद्यार्थाना सांगितली. त्यानंतर सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रधान न्यायाधीश बाल न्याय मंडळ श्रीमती एन.ए. वानखेडे यांनी बाल न्याय मुलांची काळजी कायदा, 2015 याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक ॲङ महेश वाघुंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याबाबत थोडक्यात माहिती दिली. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 




जालना, दि. 26 (जिमाका) – ग्राहकांसाठी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत ज्या ज्या सेवा येतात, त्या ग्राहकांना निश्चितपणे दिल्या जातील. तसेच ग्राहकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या  समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, अशी ग्वाही  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक दि. 25 सप्टेंबर रोजी पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, पोलीस, आरोग्य, वैधमापन शास्त्र, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह शासकीय सदस्य नंदकुमार देशपांडे, शालिणी पुराणिक, बाबासाहेब सोनटक्के, संजय देशपांडे, रमेश तारंगे, बालाप्रसाद जेथलिया, मधुकर सोनोने, संदिप काबरा, विजय जाधव, सतिश पंच, डॉ. स्वप्निल मंत्री, अनिल मुंदडा, जुमानबिन नासेर चाऊस आदी उपस्थित होते.

            प्रारंभी सदस्यांनी ग्राहकांच्या विविध समस्या मांडल्या.  वीजेची लोडशेडींग थांबवावी, अन्नपदार्थात होणारी भेसळ रोखावी, शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट रोखावा,  बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे, खाजगी दवाखान्यात एकसमान दर आकारणी, बीएसएनलने अखंडित सेवा पुरवणे, शेतकऱ्यांना विनाअडथळा सेवा पुरविण्याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले.

            जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सुविधा मिळण्यासाठी  संबंधित विभागाचे अधिकारी व ग्राहक संरक्षण परिषदेचे  सदस्य मिळून सकारात्मकपणे जबाबदारी पार पाडुयात. ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन योग्य ती दक्षता घेईल.  वीजेचा लोडशेडींगचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.  शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट रोखण्याबाबत मनपा आयुक्तांना सुचित करण्यात आले असून कोंडवाड्यासाठी यंदा जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद केली जाईल.

दरम्यान, वजन-मापे तपासणी, अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. ग्राहकांच्या समाधानासाठी सदस्यांनी ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने मांडाव्यात. असेही त्यांनी सुचित केले.

***

जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

 



जालना, दि. 26 (जिमाका) -  पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती  जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात (ता.25 सप्टेंबर) आली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी केशवे नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, मनिषा दांडगे, श्रीमती सुत्रावे, नायब तहसिलदार तुषार निकम यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

लोकशाही दिनाचे 3 ऑक्टोबर रोजी आयोजन

  

    जालना दि. 26 (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही  दिनाचे  महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजन करण्यात येते. दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी शासकिय सुट्टी असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही  दि  दिनांक 3 ऑक्टोबर 2023 (मंगळवार) रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

              लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.  तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना http://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपजिल्हाधिकारी  (सामान्य प्रशासन) संगीता सानप यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-

पंडीत दिनदयाळ उपाध्याय जयंती राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय येथे विविध कार्यक्रम संपन्न

 

       जालना दि. 25 (जिमाका) :-  युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय जयंती  व ‘मेरी माटी मेरा देश’ यानिमित्ताने राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.                              

         यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्या सुनंदा तिडक, राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हा समन्वयक़ प्रा.सोमीनाथ खाडे व संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड यांच्या वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच विद्यालयामध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी विद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांनी पवित्र कलशमध्ये माती जमा करुन विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतली. सुत्रसंचलन प्रा.सोमीनाथ खाडे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.विठ्ठल गाडेकर यांनी केले. यावेळी  प्रा.सचिन जैस्वाल, प्रा.डॉ.लहुराव दरगुडे, प्रा.मुंढे, प्रा.वाघ व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

                                                               *-*-*-* -*-

श्री गणेश विसर्जनानिमित्त 28 सप्टेंबर रोजी वाहतुक मार्गात बदल

 


 

     जालना दि. 25 (जिमाका) :-  श्री गणेश उत्सावानिमित्त श्री ची स्थापना झाली असून दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी श्री विसर्जन मिरवणुक शहरात पारंपारीक मार्गाने काढण्यात येणार आहे. मिरवणुकीच्यावेळी मिरवणुकीस अडथळा निर्माण होवू नये. रस्ता मोकळा राहावा व रस्तयावर वाहणे उभी राहून मार्गात अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. या दृष्टीने दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते श्री गणेश विसर्जन होईपर्यंत वाहतुकीचे नियमनासाठी विसर्जन मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आदेश जारी केले आहेत.

 

दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणुक अनुषंगाने वाहतुक मार्गातील बदल

 

       छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून टांगा स्टँड, सराफा बाजार, पाणीवेस, सुभाष चौक मार्गे जुना जालनामध्ये जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ओम हॉस्पीटल, मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमेहल टॉकीज जवळील पुलावरुन ग्लोबल गुरुकुल शाळा जवळुन बायपास रोडने अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल व येईल. छत्रपती शिवाजी पुतळा, बडीसडक मार्गे सदर बाजार, जवाहर बाग चौकी रहेमान गंज मार्ग जुना मोंढा, बसस्थानक कडे जाणारी वाहतूक ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिजामाता प्रवेशद्वार, जे.ई.एस. कॉलेज, बाबुराव काळे चौक, रहेमान गंज मार्गे जाईल व येईल.  नविन जालना मधील  सदर बाजार परीसर, रहेमान गंज, मुर्गी तलाव परीसर जवाहर बाग चौकी परीसरातील  मामा चौक व सुभाष चौक मार्गे जुना जालन्यात जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही जुना मोंढा कमान, दिपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कड कोट, शिश टेकडी  मार्गे जाईल व येईल.  बसस्थानक कडून येणारी व सुभाष चौक, पाणीवेस मार्गे शिवाजी महाराज पुतळाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूकही बसस्थानक, दिपक वाईन शॉप, जुना मोंढा कमान, मुर्गी तलाव, बाबुराव काळे चौक,जे.ई.एस. कॉलेज प्रवेशद्वार मार्गे जाईल व येईल.  रेल्वे स्टेशनकडून मंमादेवी मार्ग तसेच गांधी चमन वरून मंमादेवी मार्ग नविन जालनामध्ये जाणारी सर्व प्रकारची नूतन वसाहत, अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. छत्रपती संभाजीनगरकडून येणारी व जालना मोतीबाग मार्गे अंबड, रेवगाव, घनसावंगी, मंठा, सिंदखेडराजाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही ग्रेडर टी पाँईन्ट, राजुर चौफुली, नविन मोंढा, कन्हैया नगर मार्गे बायपास रोडने जाईल व येईल. वरील आदेश दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून श्री गणेश विसर्जन होईपर्यंत अंमलात राहील.असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                             -*-*-*-*-*-

 

Friday 22 September 2023

अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक, साठवणूक, वापर होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 


 

- अंमली पदार्थ विरोधात पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी

 - गांजाची लागवड करणे बेकायदेशीर

- शाळा, महाविद्यालयस्तरावर अंमली पदार्थविरोधात जनजागृती करावी

- मेडिकल स्टोअरवरील गुंगीकारक औषधांचा साठा तपासावा

 

जालना, दि. 22 (जिमाका) :- आपल्या परिसरात जर अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक, वापर अथवा साठवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी त्याबाबतची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. तर ग्रामीण भागात अंमली पदार्थ वापराबाबत किंवा शेतात गांजा या पिकाची लागवड केल्याचे आढळल्यास  सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ  यांनी केली.

   अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, या प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे, रेल्वेच्या पार्सल कार्यालयाचे प्रशांत स्वामी, सामान्य रुग्णालयाचे डॉ. संजय मेश्राम, शिक्षणाधिकारी मंगला धुपे आदी उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी  डॉ. पांचाळ  म्हणाले की,  अंमली पदार्थ शरीरास अत्यंत घातक आहेत. विशेषत: तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी  पोलीस प्रशासनाने जिल्हयात अंमली पदार्थांच्या विरोधात धडकपणे कार्यवाई करावी. कृषी विभागाने शेतात गांजा सारख्या अंमली पिकांची लागवड केल्याचे आढळल्यास पोलीसांना याबाबत माहिती द्यावी. पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांजा लागवडी विरोधात अलीकडे मोठया प्रमाणात कारवाई केली, ही बाब कौतुकस्पद असून जिल्ह्यात अंमली पदार्थ प्रकरण उघडकीस आल्यास वेळोवेळी कठोर कारवाई करुन अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री तसेच साठवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी.

कुरिअर सेवा, खाजगी ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक  होण्याची शक्यता असल्याने  त्यांची अचानक तपासणी करावी. औषध विक्रेत्यांनी  गुंगीकारक औषधांची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात विक्री करु नये. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेडीकल स्टोअरवरील गुंगीकारक औषधांचा साठा वेळोवेळी तपासून तो अधिकृतरित्या नियमाप्रमाणे खरेदी केला आहे का, याची काटेकोर तपासणी करावी. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी  अंमली  पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करावी तर अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत आणि या कार्यक्रमात अंमली पदार्थांसारख्या नशेच्या आहारी जाणार नाही याबाबतची शपथ विद्यार्थ्यांना प्राधान्याने द्यावी. संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.    

दरम्यान, आपल्या परिसरात अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक, वापर अथवा साठवणूक  केल्याचे आढळल्यास  किंवा गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी जालना पोलीस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 02482-225100 किंवा ई-मेल पत्ता sp.jalna@mahapolice.gov.in वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलीस विभागाने कळविले आहे.

 

-*-*-*-*-

आयुष्यमान भव मोहीम; जिल्ह्यात 23 सप्टेंबर रोजी आरोग्य मेळाव्याचे ग्रामीण रुग्णालयात आयोजन

 


 

जालना, दि. 22 (जिमाका) :-  केंद्र शासनाच्या महत्वांकाक्षी आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत जालना जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयस्तरावर आयुष्यमान आरोग्य मेळावा भोकरदन, घनसावंगी, परतूर, बदनापूर आणि टेंभूर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवार दि.23 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 4 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरुन तसेच वैद्यकिय महाविद्यालय स्तरावरील विशेषज्ञ यांच्याकडून रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यक असल्यास पुढील संस्थेत संदर्भित सेवा देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रताप घोडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना

 


 

मराठा प्रवर्गाकरीता तथा ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशाकरीता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.  महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ही ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. सदर योजना ही लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत सर्व माहिती  वेब प्रणालीवर www.udyog.mahaswayam.gov.in. अपलोड करीत नाही, तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही.

 

महामंडळाच्या योजनांसाठी सामाईक अटी व शर्ती :

           उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य, या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरीता तथा ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही अशांकरीता आहेत.  योजनेकरीताची वयोमर्यादेची अट स्त्री-पुरुषांकरीता कमाल ६० वर्षे असेल. लाभार्थ्याचे कौटूबिक वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखाच्या आत असावे. (जे रु. ८ लाखाच्या मर्यादेत असल्याचे तहसिलदाराचे प्रमाणपत्र) किंवा वैयक्तीक इन्कम टॅक्स रिटर्न (पती व पत्नीचे),  लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक/ कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.  दिव्यांग व्यक्तीला योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) मध्ये कमाल वयोमर्यादेचे बंधन नसेल.  गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत (i) भागीदारी संस्था (ii) सहकारी संस्था (iii) बचत गट, (iv) एल.एल.पी. (v) कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट / संस्था लाभास पात्र असतील.  महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय/ उद्योगाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल व या योजनांची अंमलबजावणी तंतोतंत शासन निर्णय दि.21 नोव्हेंबर, 2017 नुसार करण्यात येईल.

 

महामंडळाच्या योजनांची माहिती

 

*वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1)

या योजनेची मर्यादा रु. 10 लाखाहून रु. 15 लाखापर्यंत वाढविण्यात आलेली असून, महामंडळामार्फत रु. 4.5 लाखाच्या व्याज मर्यादेत परतावा करण्यात येईल. सदर व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त ७ वर्ष व व्याजाचा दर जास्तीत-जास्त द.सा.द.शे. 12 टक्के असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी मात्र बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे व ते फक्त व्यवसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे. टिप : मात्र दिनांक 20 मे, 2022 पूर्वीच्या L.O.I. धारकांना नियमानुसार रु. 10 लाखाच्या मर्यादेतील व्याज परतावा करण्यात येणार असून त्याकरीता रु. ३ लाखाची मर्यादा असेल.

 

 

*गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (IR-2)

या योजनेअंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन, दोन व्यक्तींसाठी कमाल रु. 25 लाखाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी रु. 35 लाखाच्या मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी रु. 45 लाखाच्या मर्यादेवर व

पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. 50 लाखापर्यतच्या व्यवसाय / उद्योग कर्जावर 5 वर्षांपर्यत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त 12 टक्के व्याज किंवा रु. 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये एफपीओ गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल. या योजनांचा लाभ घेण्यासाठी खालील कार्यपध्दती अत्यंत महत्वाची असून याच पध्दतीचा अवलंब करावा.

 

पात्रता प्रमाणपत्रासाठी महत्वाची कागदपत्रे :

आधार कार्ड, (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वतः च्या ई-मेल आयडीसह),  रहिवासी पुरावा यामध्ये रहिवासी दाखला,  लाईट बिल,  रेशनकार्ड,  गॅस बिल,  बँक पास बुक,  तर उत्पन्नाचा पुरावा म्हणून उत्पन्नाचा दाखला, आयटी रिटर्न यात जर लग्न झाले असल्यास नवरा-बायकोचे व लग्न झाले नसल्यास स्वतः चे आयटी रिटर्न अनिवार्य आहे. जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला,  एक पानी प्रकल्प अहवाल. (याचा नमुना वेब प्रणालीवर उपलब्ध आहे.) (ब) पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच, LOI समवेत लाभार्थ्यांने त्याला करावयाचा असलेल्या व्यवसायाचा / उद्योगाचा प्रकल्प अहवाल (आवश्यक ते सर्व कागदपत्र) घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. कर्ज मंजूरीची पुर्ण प्रक्रीया बँक त्यांच्या नियमानुसार करीत असते, यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरुपाचा हस्तक्षेप करीत नाही. कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पोचपावती बँकेकडून घ्यावी.

(क) बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर कर्ज मंजूरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेब प्रणालीवर सादर करावी. (उदा. ज्या खात्यामध्ये व्याज परतावा हवा आहे त्याचा तपशील, बँक कर्ज मंजुरी पत्र, बँकेमार्फत वितरीत करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक EMI वेळापत्रक (त्यावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य), प्रकल्प अहवाल, हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा (बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी). (ड) त्यानंतर बँकेमध्ये पुर्ण EMI हफ्ता विहित कालमर्यादेत भरल्यानंतरच महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम दाखल करावा. दाखल केलेला क्लेम अचूक असला तरच संबंधिताला व्याज परताव्याचा लाभ देता येईल. यामध्ये हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी अपलोड करणे अनिवार्य असेल. (इ) लाभार्थ्याने दाखल केलेल्या क्लेमची पडताळणी महामंडळामार्फत करण्यात येऊन, लाभार्थ्यांस अनुज्ञेय असलेली व्याज परताव्याची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाईन स्वरुपात वितरीत करण्यात येईल. या योजनांच्या लाभाकरीता कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचा संपर्क वेब प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या सहाय्याकरीता महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हानिहाय जिल्हा समन्वयकांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही खाजगी व्यक्ती/ संस्थेच्या प्रलोभनाला बळी पडू नये. असे आवाहनही महामंडळाकडून करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, प्रशासकीय इमारत, जालना येथे संपर्क साधावा.

-*-*-*-*-

 

Thursday 21 September 2023

सेवानिवृत्तीवेतन धारकांना जिल्हा कोषागार विभागाचे आवाहन

 


 

जालना, दि. 21 (जिमाका) :-  जिल्ह्यात सेवानिवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांचे आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये एकत्रीत निवृत्ती वेतन 5 लक्ष 50 हजार रूपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. वर्ष 2023 मधील माहे जून-जूलै मध्ये प्रदान सातव्या वेतन आयोगाच्या हप्प्त्यासह त्यांनी आयकर अधिनियम 1961 कलम  80 सी नुसार केलेल्या गुंतवणूकीचे, बचतीचे  कागदपत्र आणि प्रमाणपत्र यांच्या  छायांकित प्रती दिनांक 10 आक्टोंबर 2023 पूर्वी  पीपीओ क्रमांक, पेंन्शनचे बँक खाते क्रमांक आणि पॅन कार्डाच्या छायाकिंत प्रतीसह जिल्हा कोषागार कार्यालय,जालना येथे सादर करावेत. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

          आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थ संकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नविन सेक्शन 115 बीएसीनूसार आयकर गणनेसाठी न्यु टॅक्स रिजीम किंवा ओल्ड टॅक्स रिजीम असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत. सेवानिवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी  योग्य असणारा न्यु टॅक्स रिजीम किंवा ओल्ड टॅक्स रिजीम निवडावा. तसेच निवडलेला पर्याय या कार्यालयास आपले नाव ,पीपीओ क्रमांक, बॅंक व बॅंक शाखेसहीत दि. 10 आक्टोंबर 2023 पूर्वी कळविण्यात यावे. जेणेकरून आपण निवडलेल्या पर्यायानुसार देय होणारी टीडीएस वजाती करता  येईल. जे निवृत्तीवेतन धारक टॅक्स रिजीमची निवड वेळेत कळविणार नाहीत त्यांची डिफॉल्ट न्यु टॅक्स रिजीममध्ये टीडीएस वजातीचा विकल्प आहे असे गृहीत धरून आयकर गणना करण्यात येईल. तसेच कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी आयकरासाठी कोणतीही बचतीची माहिती सादर करू नये. असे जिल्हा कोषागार अधिकारी ,जालना प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

-*-*-*-*-

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 


 

जालना, दि. 21 (जिमाका) :-  शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र अनु.जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील अर्ज नोंदणीसाठी दि.21 सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत वेळ देण्यात आला होता. तरी जालना जिल्ह्यातील महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तसेच अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून आल्याने अर्ज करण्यास दि.25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची दि.25 सप्टेंबर पुर्वीच पडताळणी करुन परिपूर्ण पात्र अर्ज मंजूर करावेत तसेच त्रुटीचे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनवर पाठवून त्रुटीची पुर्तता करुन घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

Wednesday 20 September 2023

जिल्ह्यातील 35 स्वयं सहाय्यता बचतगटांची मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी लॉटरी पध्दतीने निवड

 


 

जालना, दि. 20 (जिमाका) :-  शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्याची योजना आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत एकुण 35 मिनी ट्रॅक्टरचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज मागविण्यात येवून या अर्जाची छाननी करुन पात्र ठरलेल्या 99 बचतगटांपैकी उद्दिष्टानूसार लहान मुलींच्या हस्ते चिठ्या काढून लॉटरी पध्दतीने जिल्ह्यातील एकुण 35 स्वयंसहाय्यता बचतगटांची निवड करण्यात आली.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेंअंतर्गत लाभार्थ्यांच्या निवडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदिप भोगले, समाज कल्याण अधिकारी दत्तात्रय वाघ, उपायुक्त वैशाली हिंगे, महात्मा फुले महामंडळाच्या व्यवस्थापक श्रीमती सी.ए.वाकोडे, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापक श्री.राठोड, कार्यालयीन अधिक्षक ए.बी.ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अंतिम निवड झालेल्या 35 स्वयंसहाय्यता बचतगटामध्ये दक्षा दारिद्रयरेषेखालील महिला              स्वयं सहाय्यता बचतगट जालना, त्रिशा बीपीएल स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, भिमाई माता महिला स्वयंसहाय्यता बचतगट सावरगाव ता.जि.जालना, बाळासाहेब शेतकरी पुरुष बचतगट सावरगाव, आनंद पुरुष बचतगट जालना, संत रोहिदास महाराज स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट बक्कालकुवा जालना, तथागत पुरुष बचतगट जालना, महाबोधी स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट ढांबरी, सृष्टी मागासवर्गीय स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट इंदेवाडी, नारीशक्ती महिला स्वयंसहाय्यता बचतगट मानेगाव, संसार स्वयंसहाय्यता महिला बचतगट हिवरा रोषणगाव, कर्तव्य महिला स्वयंसहाय्यता बचतगट  जालना, रुतुजा महिला स्वयंसहाय्यता बचतगट चितळी पुतळी, संगम स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट गवळी पोखरी, माता रमाई आंबेडकर स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट गवळी पोखरी, स्वप्निल स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट चंदनझिरा, सरिता स्वयंसहाय्यता महिला बचतगट चंदनझिरा, स्मित महिला स्वयंसहाय्यता बचतगट जालना, विनोद स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट, जनकल्याण पुरुष स्वयंसहाय्यता बचतगट जालना, संकल्प स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, अशोका स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, प्रगती स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना,   लहुजी स्वयंसहाय्यता महिला बचतगट जालना, सम्राट स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, लक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचतगट जालना, वैभव स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, धम्मज्योती स्वयंसहाय्यता महिला बचतगट बोधलापूरी, शल्यपुत्र मागासवर्गीय स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी शेतकरी स्वयं सहाय्यता बचतगट बोधलापूरी, माता भिमाई स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, लहुवंश स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट मानेगाव, ओम स्वयंसहाय्यता बचतगट जुना जालना, आनंदराज स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना आणि युवाशक्ती शेतकरी स्वयंसहाय्यता बचतगट अहंकार देऊळगाव यांचा समावेश आहे. निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचतगटामधील काही बचतगटांनी ट्रॅक्टर खरेदी न केल्यास उद्दीष्टपूर्तीच्या अनुषंगाने एकुण 5 बचतगटांची प्रतिक्षाधीन यादीमध्ये निवड करुन ठेवण्यात आली आहे.  निवड झालेल्या प्रत्येकी 3 लाख 15 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून 10 टक्के लाभार्थ्यांना हिस्सा म्हणजे 35 हजार रुपये स्वत:ला भरावे लागणार आहेत. निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचतगटांची यादी केवळ या वर्षासाठीच वैध राहणार आहे. असे श्री.भोगले यांनी सांगितले. यावेळी पात्र बचतगटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

-*-*-*-*-

जिल्हा उद्योग केंद्र व एमसीईडीतर्फे जालना, घनसावंगी, अंबड व बदनापूर येथे विविध प्रशिक्षणाचे आयोजन

 


 

जालना, दि. 20 (जिमाका) :-  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, जालना पुरस्कृत विशेष घटक प्रवर्गातील युवक-युवतींकरिता सन 2023-24  अंतर्गत मोफत विविध तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेवून स्वतःचा स्वंयरोजगार उभारावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करूणा खरात आणि विभागीय अधिकारी डी. यु. थावरे यांनी केले आहे.

जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणात बदनापूर येथे मोफत बेसिक कॉम्प्युटर प्रशिक्षण (वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष पात्रता), घनसावंगी येथे मोफत कापडी पिशवी आणि पेपर बँग तयार करणे  प्रशिक्षण (वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष पात्रता), अंबड येथे मोफत टॅली जीएसटी प्रशिक्षण (वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष पात्रता), जालना येथे मोफत गारमेंट तयार करणे (वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष पात्रता) आणि  रेशीमपासून धागा तयार करण्याचे प्रशिक्षण (वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष पात्रता) देण्यात येणार आहे. उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे लाभार्थींनी वळून स्वतःचा स्वंयरोजगार निर्माण करावा हा या कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. प्रात्याक्षिकद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

उद्योजकता विकास प्रशिक्षणात उद्योजकीय गुणसंपदा, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासासाठी सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ, पाहणीतंत्र व तंत्र विपणन व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना व कर्ज प्रकरणे व्यवस्थापन व विक्री कौशल्य लघु उद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, अकाउंटस, लघु उद्योजकाचे व्यवस्थापन, बँकेचे व्यवहार इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रम हा संपूर्णत: मोफत असून यासाठी लाभार्थी किमान सातवी पास पात्रता धारक इच्छुक लाभार्थींना प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक गजानन गाढे मो. 9579264868, अमित देशमुख मो.9689552233,  दिलीप शिलवंत मो.8087283065, कैलास भाबट मो. 9689673942 यांच्याशी किंवा एमसीईडी प्रकल्प अधिकारी विनोद तुपे यांच्याशी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, जालना औरंगाबाद रोड, जालना फोन.नं.02482-220592 येथे दि.29  सप्टेंबर 2023 पर्यंत संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ,जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-