Wednesday 6 September 2023

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवानिमित्त महिलांसाठी स्व-संरक्षण व सुरक्षेचे प्रशिक्षण

 


 जालना, दि. 6 (जिमाका) :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना मार्फत दि. 8 सप्टेंबर 2023 सकाळी 10 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे महिलांसाठी स्व-संरक्षण व सुरक्षेचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबीरास तज्ञ प्रशिक्षक वर्ग मार्गदर्शन करणार आहे. या प्रशिक्षणासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, संघटना तथा खाजगी आस्थापनेवरील महिला कर्मचारी तसेच शहरातील इतर सर्व क्षेत्रातील महिलांनी  जिल्ह्यातील इयत्ता 8 वी पासून पुढे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी, तरूणींनी या प्रशिक्षण शिबीरात सहभागी होऊन स्व-संरक्षण व सुरक्षेचे धडे घ्यावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठवाडा मुक्ती संग्रामास यावर्षी 75 वर्षे पुर्ण होत आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षात आयोजित करावयाच्या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी शासन निर्णय दि. 4 मे 2022 अन्वये विविध कार्यक्रमाचा आराखडा देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, जालना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्याकडे महिलांसाठी स्व-संरक्षण व सुरक्षेचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.  अधिक माहितीसाठी संतोष वाबळे (मो.7588169493) यांच्याशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.               

-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment