Tuesday 26 September 2023

जालना येथे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकाचे संरक्षण कायदा मार्गदर्शन शिबीर संपन्न

 


 

जालना, दि. 26 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 25 सप्टेंबर 2023  रोजी उर्दू हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय, जालना येथे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकाचे संरक्षण कायदा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहिते, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  श्रीमती प्रणिता भारसाकडे- वाघ, आणि सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रधान न्यायाधीश बाल न्याय मंडळ श्रीमती एन. ए. वानखेडे आदि उपस्थित होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मोहिते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांना समजेल अशा सोप्या शब्दात लैंगिक गुन्ह्यांपासुन बालकांचे संरक्षण कायदा अगदी सहज समजावून सांगितला. तसेच सदर कायद्यामध्ये शिक्षेचे प्रावधान आणि विद्यार्थ्यांना गुड टच आणि बँड टच याबाबत सांगितले. तसेच मुलींच्या विविध प्रश्नांबाबत एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.

प्रारंभी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती भारसाकडे-वाघ, यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगुन तसेच मंचावर उपस्थित सर्वांची ओळख करून कार्यक्रमाची सुरूवात केली. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण याविषयीची माहिती उपस्थित विद्यार्थाना सांगितली. त्यानंतर सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रधान न्यायाधीश बाल न्याय मंडळ श्रीमती एन.ए. वानखेडे यांनी बाल न्याय मुलांची काळजी कायदा, 2015 याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक ॲङ महेश वाघुंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याबाबत थोडक्यात माहिती दिली. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment