Wednesday 20 September 2023

जिल्हा उद्योग केंद्र व एमसीईडीतर्फे जालना, घनसावंगी, अंबड व बदनापूर येथे विविध प्रशिक्षणाचे आयोजन

 


 

जालना, दि. 20 (जिमाका) :-  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, जालना पुरस्कृत विशेष घटक प्रवर्गातील युवक-युवतींकरिता सन 2023-24  अंतर्गत मोफत विविध तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेवून स्वतःचा स्वंयरोजगार उभारावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करूणा खरात आणि विभागीय अधिकारी डी. यु. थावरे यांनी केले आहे.

जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणात बदनापूर येथे मोफत बेसिक कॉम्प्युटर प्रशिक्षण (वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष पात्रता), घनसावंगी येथे मोफत कापडी पिशवी आणि पेपर बँग तयार करणे  प्रशिक्षण (वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष पात्रता), अंबड येथे मोफत टॅली जीएसटी प्रशिक्षण (वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष पात्रता), जालना येथे मोफत गारमेंट तयार करणे (वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष पात्रता) आणि  रेशीमपासून धागा तयार करण्याचे प्रशिक्षण (वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष पात्रता) देण्यात येणार आहे. उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे लाभार्थींनी वळून स्वतःचा स्वंयरोजगार निर्माण करावा हा या कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. प्रात्याक्षिकद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

उद्योजकता विकास प्रशिक्षणात उद्योजकीय गुणसंपदा, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासासाठी सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ, पाहणीतंत्र व तंत्र विपणन व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना व कर्ज प्रकरणे व्यवस्थापन व विक्री कौशल्य लघु उद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, अकाउंटस, लघु उद्योजकाचे व्यवस्थापन, बँकेचे व्यवहार इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रम हा संपूर्णत: मोफत असून यासाठी लाभार्थी किमान सातवी पास पात्रता धारक इच्छुक लाभार्थींना प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक गजानन गाढे मो. 9579264868, अमित देशमुख मो.9689552233,  दिलीप शिलवंत मो.8087283065, कैलास भाबट मो. 9689673942 यांच्याशी किंवा एमसीईडी प्रकल्प अधिकारी विनोद तुपे यांच्याशी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, जालना औरंगाबाद रोड, जालना फोन.नं.02482-220592 येथे दि.29  सप्टेंबर 2023 पर्यंत संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ,जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment