Thursday 7 September 2023

केंद्रीय सैनिक बोर्डाच्या पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत

 


जालना, दि. 7 (जिमाका) :-  जालना जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिक विधवा, अवलंबितांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती मिळण्यासाठीची प्रकरणे www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे सादर करणेची कार्यवाही सुरु झाली आहे. इयत्ता बारावी, किंवा पदविका मध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व प्रथम किंवा द्वितीय वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दिनांक 1 एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत प्रवेश घेतलेला असावा. तरी  पात्र व इच्छुक माजी सैनिकाच्या पाल्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

            ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी व उर्वरित कागदपत्रांची छांयाकीत प्रत काढुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावी. ऑनलाईन फॉर्म भरण्याची कार्यवाही सुरु असुन शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 अशी आहे. सुधारित जोडपत्र 1, 2 व 3 (2023-2024) आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची सविस्तर माहिती के.एस.बी. च्या संकेतस्थळावर (www.ksb.gov.in) उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क करावा. अभ्यासक्रमाची यादी ऑनलाईन पहावी.  असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment