Thursday 21 September 2023

सेवानिवृत्तीवेतन धारकांना जिल्हा कोषागार विभागाचे आवाहन

 


 

जालना, दि. 21 (जिमाका) :-  जिल्ह्यात सेवानिवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांचे आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये एकत्रीत निवृत्ती वेतन 5 लक्ष 50 हजार रूपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. वर्ष 2023 मधील माहे जून-जूलै मध्ये प्रदान सातव्या वेतन आयोगाच्या हप्प्त्यासह त्यांनी आयकर अधिनियम 1961 कलम  80 सी नुसार केलेल्या गुंतवणूकीचे, बचतीचे  कागदपत्र आणि प्रमाणपत्र यांच्या  छायांकित प्रती दिनांक 10 आक्टोंबर 2023 पूर्वी  पीपीओ क्रमांक, पेंन्शनचे बँक खाते क्रमांक आणि पॅन कार्डाच्या छायाकिंत प्रतीसह जिल्हा कोषागार कार्यालय,जालना येथे सादर करावेत. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

          आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थ संकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नविन सेक्शन 115 बीएसीनूसार आयकर गणनेसाठी न्यु टॅक्स रिजीम किंवा ओल्ड टॅक्स रिजीम असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत. सेवानिवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी  योग्य असणारा न्यु टॅक्स रिजीम किंवा ओल्ड टॅक्स रिजीम निवडावा. तसेच निवडलेला पर्याय या कार्यालयास आपले नाव ,पीपीओ क्रमांक, बॅंक व बॅंक शाखेसहीत दि. 10 आक्टोंबर 2023 पूर्वी कळविण्यात यावे. जेणेकरून आपण निवडलेल्या पर्यायानुसार देय होणारी टीडीएस वजाती करता  येईल. जे निवृत्तीवेतन धारक टॅक्स रिजीमची निवड वेळेत कळविणार नाहीत त्यांची डिफॉल्ट न्यु टॅक्स रिजीममध्ये टीडीएस वजातीचा विकल्प आहे असे गृहीत धरून आयकर गणना करण्यात येईल. तसेच कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी आयकरासाठी कोणतीही बचतीची माहिती सादर करू नये. असे जिल्हा कोषागार अधिकारी ,जालना प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment