Thursday 7 September 2023

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

 


 

जालना, दि. 7 (जिमाका) :-  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक -युवतीसाठी दि. 3 ऑक्टोंबर  ते 12 ऑक्टोंबर 2023  या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 54 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे. तरी, जालना जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभागण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दि.22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

            उमेदवारांनी  मुलाखतीस येतेवेळी त्यांनी  डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेयरवर सर्च करुन त्यामधील एसएसबी-54 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) किंवा व्हॉटस अप 9156073306 या मोबाइल नंबर वर एसएसबी-54 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करुन दिले जाईल शिफारस पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.  केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमुद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवुन यावेत.

             कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस अकेडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.  एनसीसी 'सी' सर्टीफिकेट 'ए' किंवा 'बी' ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी.  टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखती साठी कॉललेटर असावे. युनिव्हसिटी इन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.  अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल traing.petcnashik@gmail.com व दुरध्वनी क्रं. 0253-2451032 व भ्रमणध्वनी क्रं 9156073306 असुन कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जालना यांनी केले आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment