Friday 1 September 2023

जिल्हा ग्रंथालयातील ग्रंथाची संगणकात नोंद करण्यासाठी निविदा मागविली

 


जालना, दि.1 (जिमाका) :-  मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या व जिल्हा ग्रंथालयात आणि डिजीटल उपकेंद्र घनसावंगी येथील कार्यालयात उपलब्ध असलेल्या सुमारे 1,30,000 ग्रंथ संपदेची विहीत नमुन्यातील विविरणपत्रात एक्सेल शिटमध्ये ऑफलाईन नोंद करावयाची आहे.  ग्रंथाची नोंदणी करणे, बारकोड लेबलचे स्टिकर लावणे, ग्रंथ संग्रहाची दाखल नोंद क्रमाने कपाटामध्ये मांडणी इत्यादी कामे करावयाची आहेत. हे काम बाह्य यंत्रणेकडून  करावयाचे असून करार पध्दतीने काम करुन देण्यास इच्छुक असलेल्या अनुभवी कंत्राटदार संस्था अथवा व्यक्तीकडून मोहोरबंद लिफाफ्यामध्ये दरपत्रक जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जालना कार्यालयात दि.14 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निविदा सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment