Friday 15 September 2023

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनेया योजनेंतर्गत अर्ज केलेल्या बचतगटांनी लॉटरी पध्दतीने निवडीसाठी 20 सप्टेंबरला हजर रहावे

 


 

जालना, दि. 15 (जिमाका) :-  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतात. सन 2022-23 या आर्थिक वर्षात सदर योजनेंतर्गत एकुण 35 मिनी ट्रॅक्टर चे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज मागविण्यात आले होते. पात्र असलेल्या बचतगटांपैकी उद्दिष्टाच्या अनुषंगाने 35 बचतगटांची निवड करावयाची आहे. त्यानुषंगाने सदर बचतगटांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. सदर बचतगटांची अंतिम पात्र व अपात्र यादी कार्यालयाच्या सुचनाफलकावर डकविण्यात आली आहे. तरी सर्व बचतगटांनी दि. 20 सप्टेंबर 2023  रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतीक सभागृहामध्ये पात्र बचतगटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी लॉटरी पध्दतीने स्वयंसहाय्यता बचतगटांची निवड करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment