Friday 1 September 2023

निवडणुक साक्षरता मंडळ जालना जिल्ह्यात होणार स्थापन

 



 

जालना दि. 1 (जिमाका):-  भारत निवडणूक आयोगाकडुन नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये निवडणुक विषयक जनजागृती करण्यासाठी नुकतीच जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.  जालना जिल्ह्यात निवडणुक साक्षरता मंडळाची स्थापना होणार असून     जास्तीतजास्त महाविद्यालयांनी यात सहभागी होऊन निवडणूक विषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या उपक्रमामुळे युवकांच्या माध्यमांतून निवडणूकीविषयी सजगता निर्माण होण्याकरीता  निवडणुक साक्षरता मंडळ फलदायी ठरेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

 

बैठकीमध्ये महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये निवडणुक साक्षरता संदर्भात जनजागृती प्रचार व प्रसार व्हावा. प्रत्येक महाविद्यालयामध्ये निवडणुक साक्षर मंडळाची स्थापना करुन अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या मंडळात व्हावा या उद्देशाने पुढील कामकाजाचे स्वरुप निश्चित करुन रुपरेषा ठरविण्यात आली.

 

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना,  निवडणुक उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल,वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे सीईओ तेजस गुजराथी, अंबडचे उपविभागीय अधिकारी दिपक पाटील, शिक्षणाधिकारी  व जिल्हा नोडल अधिकारी कैलास दातखिळ, एडीईआय आर. एन. जारवाल, वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे महाराष्ट्र समन्वयक अल्ताफ पिरजादे, जिल्हा समन्वयक आकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सोमीनाथ खाडे, डॉ. बद्रीनाथ घोंगे, संतोष मुसळे यांच्यासह जिल्ह्यातील तहसिलदार, उपविभागीय अधिकारी नायक तहसिलदार हे दुरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment