Thursday 14 September 2023

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पणन, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार

 


    जालना, दि. 14 (जिमाका) :- दिनांक 17 सप्टेंबर, 2023 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पणन, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार, यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक, टाऊन हॉल, जुना जालना येथे सकाळी ठीक 9.00 वाजता  होणार आहे.

 

       महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील सुचनेनुसार मराठवाडयातील सर्व तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी यांनी उपविभागीय मुख्यालयात व तहसिलदार यांनी तालुका मुख्यालय येथे ध्वजारोहण करावे. तसेच मराठवाडयातील मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहण मुख्य शासकीय समारंभ संपुर्ण मराठवाडा विभागात एकाच वेळी आयोजीत करण्यात यावा, अशा सुचना केल्या आहेत.

 

      जालना जिल्हयामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने दि. 14 ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करणे, हुतात्मा स्मारकांना भेटी देणे व स्वच्छता करणे, हुतात्मा स्मारक ते हुतात्मांच्या घरापर्यंत गौरव रॅली काढणे, प्रेरणादायी घोषण पेंट करणे, रक्तदान, आरोग्य शिबीर व रांगोळी स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी व राष्ट्रगीत, राज्यगीत व मराठवाडा मुक्ती संग्राम गीत गायन करणे जालना जिल्हयातील पाच हुतात्मा स्मारक यांचे नुतनीकरण व सुशोभीकरण कामाचे भुमीपुजन व परिसरात वृक्ष लागवड, मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने जनजागृतीपर पथनाटय, संपूर्ण जिल्हयात मार्गक्रमण केलेल्या चित्ररथ यात्रेचा समारोप, सांस्कृतिक कार्यकम तसेच इतर स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहेत, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment