Tuesday 26 September 2023

श्री गणेश विसर्जनानिमित्त 28 सप्टेंबर रोजी वाहतुक मार्गात बदल

 


 

     जालना दि. 25 (जिमाका) :-  श्री गणेश उत्सावानिमित्त श्री ची स्थापना झाली असून दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी श्री विसर्जन मिरवणुक शहरात पारंपारीक मार्गाने काढण्यात येणार आहे. मिरवणुकीच्यावेळी मिरवणुकीस अडथळा निर्माण होवू नये. रस्ता मोकळा राहावा व रस्तयावर वाहणे उभी राहून मार्गात अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. या दृष्टीने दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते श्री गणेश विसर्जन होईपर्यंत वाहतुकीचे नियमनासाठी विसर्जन मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आदेश जारी केले आहेत.

 

दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणुक अनुषंगाने वाहतुक मार्गातील बदल

 

       छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून टांगा स्टँड, सराफा बाजार, पाणीवेस, सुभाष चौक मार्गे जुना जालनामध्ये जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ओम हॉस्पीटल, मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमेहल टॉकीज जवळील पुलावरुन ग्लोबल गुरुकुल शाळा जवळुन बायपास रोडने अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल व येईल. छत्रपती शिवाजी पुतळा, बडीसडक मार्गे सदर बाजार, जवाहर बाग चौकी रहेमान गंज मार्ग जुना मोंढा, बसस्थानक कडे जाणारी वाहतूक ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिजामाता प्रवेशद्वार, जे.ई.एस. कॉलेज, बाबुराव काळे चौक, रहेमान गंज मार्गे जाईल व येईल.  नविन जालना मधील  सदर बाजार परीसर, रहेमान गंज, मुर्गी तलाव परीसर जवाहर बाग चौकी परीसरातील  मामा चौक व सुभाष चौक मार्गे जुना जालन्यात जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही जुना मोंढा कमान, दिपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कड कोट, शिश टेकडी  मार्गे जाईल व येईल.  बसस्थानक कडून येणारी व सुभाष चौक, पाणीवेस मार्गे शिवाजी महाराज पुतळाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूकही बसस्थानक, दिपक वाईन शॉप, जुना मोंढा कमान, मुर्गी तलाव, बाबुराव काळे चौक,जे.ई.एस. कॉलेज प्रवेशद्वार मार्गे जाईल व येईल.  रेल्वे स्टेशनकडून मंमादेवी मार्ग तसेच गांधी चमन वरून मंमादेवी मार्ग नविन जालनामध्ये जाणारी सर्व प्रकारची नूतन वसाहत, अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. छत्रपती संभाजीनगरकडून येणारी व जालना मोतीबाग मार्गे अंबड, रेवगाव, घनसावंगी, मंठा, सिंदखेडराजाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही ग्रेडर टी पाँईन्ट, राजुर चौफुली, नविन मोंढा, कन्हैया नगर मार्गे बायपास रोडने जाईल व येईल. वरील आदेश दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून श्री गणेश विसर्जन होईपर्यंत अंमलात राहील.असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                             -*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment