Friday 15 September 2023

नेहरु युवा केंद्र जालना येथे हिंदी दिवस पखवाड्याचे उदघाटन संपन्न

 


 

जालना, दि. 15 (जिमाका) :- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने 14 ते 29 सप्टेंबर हिंदी पखवाडा कार्यक्रम जिल्हाभरात  राबविण्यासाठी उदघाटन नेहरु युवा केंद्र जालना येथे करण्यात आले.

यावेळी प्रा.डॉ. रेणुका भावसार व जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.  यावेळी नेहरु युवा केंद्र संगठनचे महानिदेशक द्वारा हिंदी दिवस करीता अपील वाचण्यात आली व हिंदी दिवस शपथ दिली. तसेच 2 ऑक्टोबर 2023 ला संसदेत होणाऱ्या कार्यक्रमासाठी भाषण स्पर्धा प्रथम चरणामध्ये घेण्यात आली. यावेळी जिल्हा भाषण स्पर्धेमध्ये अदिती सुरंगळीकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित वैभवी जगताप, अमृत शेळके, वैभव कांगणे, संदिप दांडगे, सागर मगरे , सुमेधा कातुरे व प्रिती झिने इत्यादी सहभागी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन आभार जयपाल राठोड यांनी मानले. असे जिल्हा युवा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment