Wednesday 6 September 2023

जालना येथे 7 सप्टेंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

जालना येथे 7 सप्टेंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन जालना, दि. 6 (जिमाका) :- जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,व मॉडेल करिअर सेंटर जालना, प्रशासकीय इमारत २ माळा, जालना येथे गुरुवार दि.7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधी आयोजित करण्यात आला आहे. तरी इच्छुकांनी उपस्थित राहून प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. आई इंन्शुरन्स & इन्वेस्टमेंट सर्विसेस, जालना यांची दहावी/बारावी/पदवीधर उत्तीर्ण करीता इंसुरन्स ॲडव्हाजर पदासाठी ५१ पदे, एस. बी. आय लाईफ इंसुरस प्रा. लि. जालना पदवीधर उत्तीर्ण करीता डेव्हलपमेंट मॅनेजर 20‍ पदे तसेच एजन्सी मॅनेजर 10 पदे असे एकूण 81 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या सुवर्ण संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर जालना याची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान तीन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ.कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून दि.7 सप्टेबर 2023 गुरुवार सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, जालना येथे उपस्थित रहावे, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment