Wednesday 6 September 2023

बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी बँक खात्याची माहिती सादर करण्याचे आवाहन

 


जालना, दि. 6 (जिमाका) :-  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयामार्फत बाल संगोपन योजना राबविली जाते. या योजने अंतर्गत लाभाची रक्कम बालकांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असतात. तरी बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी बँक खात्याची माहिती सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.एन. चिमंद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बाल संगोपन योजनेच्या काही लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा केलेली रक्कम लाभार्थ्यांची खाती बंद आहेत. कार्यान्वित नाहीत अथवा आयएफएससी कोड चुकीचा असल्या कारणाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या खात्यावर पुन्हा जमा होत आहेत. त्यामुळे बाल संगोपन योजनेचा लाभ मिळणेसाठी सादर केलेल्या खाते क्रमांकाचे पासबुकचे स्टेटमेंट दि. 31 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत अद्यावत केल्यानंतर ज्या लाभार्थ्यांची बालसंगोपन योजनेची रक्कम बँक खात्यात जमा झालेली नाही. फक्त अशाच लाभार्थ्यांनी तातडीने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, कार्यालय, प्रशासकीय इमारत तळ मजला, जालना येथे प्रत्यक्ष संपर्क साधून नवीन कार्यान्वित खाते क्रमांकाची माहिती व या सा अगोदर सादर केलेल्या बँक खातेच्या पासबुकच्या स्टेटमेंटसह सादर करावेत. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment