Friday 1 September 2023

लोक अभिरक्षक कार्यालयाच्या फलकाचे अनावरण

 

जालना, दि.1 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी नियुक्त केलेल्या आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना या कार्यालयाअंतर्गत येणारे लोक अभिरक्षक कार्यालय, जालना Legal Aid Defense Counsel System ही प्रणाली कार्यान्वीत केली आहे. त्या अंतर्गत मुख्य महत्त्वाचे कार्य म्हणजे फौजदारी खटल्यांमध्ये मोफत शासकीय वकील मिळणे हे आहे तसेच इतरही कार्य या प्रणालीद्वारे चालविले जाते. लोक अभिरक्षक कार्यालयाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

शुक्रवार दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी लोक अभिरक्षक कार्यालय, जालना या कार्यालयाने पोलीस अधिक्षक कार्यालय, जालना येथे या कार्यालयाचे शासकीय वकील तसेच त्यांचे दुरध्वनी कमांकाचे फलक पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या उपस्थितीत पोलीस अधिक्षक कार्यालयात लावण्यात आला जेणेकरून तेथे येणा-या अभिभावकांना लोक अभिरक्षक कार्यालय, जालना Legal Aid Defense Counsel System या प्रणाली ची माहिती होईल. लोक अभिरक्षक कार्यालय, जालना Legal Aid Defense Counsel System ही प्रणाली यामधील अधिकारी मुख्य लोकअभिरक्षक एम. आर. वाघुंडे, उपमुख्य लोकअभिरक्षक वाय. एस. कुलकर्णी,  वाय.एस. खरात, सहायक मौजुद शेख,  यश लोसरवार, अर्सलान शेख, ज्ञानेश्वर शेंडगे हे सदर फलकाचे अनावरणावेळी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

-*-*-*-*-


No comments:

Post a Comment