Monday 15 February 2021

राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीमध्ये जालना जिल्ह्यासाठी 260 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

             




            जालना, दि. 15 (जिमाका) :- सन 2021-22 या आर्थिक वर्षात 260 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली. शासनाने 181 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित करुन दिली होती.  त्यामध्ये 79 कोटी रुपयांची वाढ उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्य केली.

      औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठक संपन्न झाली. या बैठकीस  आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल,  आमदार अंबादास दानवे, आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त व नियोजन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे  प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  जिल्हा परिषद   प्रताप सवडे जिल्हा नियोजन अधिकारी  सुनिल सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

      यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील शाळा खोल्यांची इमारतींची अत्यंत दुर्दशा झाली असून   शाळांच्या ईमारती मोडकळीस आल्या आहेत. तसेच   जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, दवाखान्यांसाठीसुद्धा ईमारतींची आवश्यकता असून आरोग्य व शिक्षणासाठी अधिकच्या निधीची मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री पवार यांनी जालना जिल्ह्यासाठी 79 कोटी रुपयांचा अधिकचा निधी मंजूर केला.                 

 उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले, जालना जिल्ह्याच्या विकासासाठी 260 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत असून यापैकी 10 कोटी रुपये क्रीडा संकुळासाठी देण्यात येत आहेत. उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण   कामे करण्यात यावीत. सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात मिळाव्यात यासाठी आरोग्य सेवा सक्षमीकरनावावर  अधिक भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.                                   यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी विकास कामासाठी निधीची मागणी केली.    या बैठकीस जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

 

जिल्ह्यात 22 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 33 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

                                     

     जालना दि. 15 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 33 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे  तर  जालना तालुक्यातील  जालना शहर –14, अंबड तालुक्यातील  धनगर पिंप्री -1, बदनापुर तालुक्यातील खांडवी -1, जाफ्राबाद तालुक्यातील वरुड -1, भोकरदन तालुक्यातील मालेगाव -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -4,  आरटीपीसीआरद्वारे  33  व्यक्तीचा  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक  असे एकुण 33 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 20333 असुन  सध्या रुग्णालयात-114 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-7119 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.110 वढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-123513 वढी आहे.  प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -22 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-14132 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-108752 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने - 298, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -7078

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 9,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6661 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -7,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-114,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-33, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-13581,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-177 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-199543 मृतांची संख्या-374              

          आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-    

 

 

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

22

14132

डिस्चार्ज

33

13581

मृत्यु

0

374

1         शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

291

2        खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

83

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

95

88902

पॉझिटिव्ह

22

11827

पॉझिटिव्हीटी रेट

23.2

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

15

34749

पॉझिटिव्ह

0

2305

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

6.63

एकुण टेस्ट

110

123651

पॉझिटिव्ह

22

14132

पॉझिटिव्ह रेट

20.00

11.43

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

82413

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

20219

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

23

 होम क्वारंटाईन      

23

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

199543

हाय रिस्क  

70884

लो रिस्क   

96.10

 रिकव्हरी रेट

 

2.65

मृत्युदर

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4865

 

अधिग्रहित बेड

109

 

उपलब्ध बेड

4756

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

97

 

उपलब्ध बेड

523

डीसीएचसी बेड क्षमता

 

723

 

अधिग्रहित बेड

12

 

उपलब्ध बेड

711

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

46

 

उपलब्ध बेड

169

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

              37

 

उपलब्ध बेड

628

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

8

 

उपलब्ध बेड

106

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

3522

- *-*-*-*-*-*-*-