Monday 31 July 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बीएसएनएलला प्राप्त होणार गतवैभव - मुख्य महाप्रबंधक शर्मा यांची माहिती

 


जालना दि.31 (जिमाका) :- भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरदृष्टीपणामुळे लवकरच 4जी आणि 5जी सुरू करणार, त्यासाठी लागणारी जमीन देशातील सर्व राज्यसरकार जमीन मोफत उपलब्ध करवून देणार असून लवकरच संपूर्ण देशात 4जी आणि 5जी सेवा सुरू होईल. त्यामुळे बीएसएनएलला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होणार असा विश्वास महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे मुख्य महाप्रबंधक रोहित शर्मा यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

श्री. शर्मा जालना जिल्ह्यातील बीएसएनएलच्या सेवांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाप्रबंधक प्रशांत सिंह, औरंगाबाद परिमंडळाचे महाप्रबंधक संजयकुमार केशेरवानी, जालन्याचे सहाय्यक महाप्रबंधक किशोर वाढवे, उपमंडल अभियंता गौतम वावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री शर्मा म्हणाले की, मार्केट कंट्रोल करण्यासाठी आणि प्राईस वार थांबवण्यासाठी बीएसएनएलची सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे, देशात सर्वात स्वस्त आणि किफायतशीर सेवा फक्त बीएसएनएल देऊ शकेल असा विश्वास केंद्र सरकारला असून भारतात बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेला गतवर्षी जुलै महिन्यात मंजुरी मिळाली होती. त्यानुसार बीएसएनएलच्या 4G व G5 सेवेसाठी देशभरात २० हजार टावर्स उभारले जात आहेत. ज्या गावात 4G सेवेचे सिग्नल मिळत नाही अशा ३४ हजार गावातही 4G सेवा उपलब्ध होणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेचे तंत्रज्ञान हे भारतातच विकसित करण्यात आले असून हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला आहे. हे तंत्रज्ञान सी. डाट व तेजसने विकसित केले आहे. याच्या प्राथमिक चाचण्या देखील झाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यात 4G व 5G सेवा कार्यान्वित होण्यासाठी २ हजार ८०० गावात नवीन टावर्स उभारले जाणार असून त्यासाठी सरकारी जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले असल्याचे श्री शर्मा यांनी सांगितले. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरदृष्टीपणामुळे बीएसएनएल ही सेवा लवकरच सुरू करणार आहे. त्यामुळे बीएसएनएलला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होणार असा विश्वास व्यक्त करून श्री शर्मा म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएल आता कमी मनुष्यबळाचा वापर करीत आहे. त्यामुळे दूरसंचार विभागाच्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत. जालना येथील टेलीफोन भवनातील खालचा मजला रिकामा झाला असून तो आता किरायाने देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाप्रबंधक संजय केशरवानी यांनी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेसाठी नवीन टावर्स उभारले जाणार असल्याचे सांगून वर्तमान सेवा अधिक चांगल्या प्रकारे कशी देता येईल, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. यावेळी जालना येथील बीएसएनएलचे गजानन जाधव, उज्वल पाटील, बीएसएनएल अधिकारी उपस्थित होते. असे सहाय्यक सामान्य व्यवस्थापक, भारत संचार निगम लिमिटेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

जिल्ह्यात महसूल सप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

 


जालना दि.31 (जिमाका) :-  जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम नियोजित आहेत. महसूल दिनानिमित्त 1 ऑगस्ट पासून ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी महसूल विभागाशी संबंधित कामकाजाविषयी आपापल्या तालुक्यातील शिबीराच्या माध्यमातून लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महसूल सप्ताहानिमित्त दि.1 ऑगस्ट 2023 रोजी महसूल दिन साजरा व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येईल. यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येवून सन्मानित करण्यात येईल. तसेच नागरिकांकडून दाखल सर्व प्रकरणे ई-हक्क पोर्टलवर तलाठ्यांमार्फत, सेतूसुविधा केंद्रामार्फत नोंदी घेण्यात येतील. यावर तहसीलदार व नगरभूमापन अधिकारी दुरुस्तीचे आदेश पारित करतील. गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येईल.

दि.2 ऑगस्ट रोजी युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. यात दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास, उत्पन्न, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करणे व पात्र उमेदवारांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल. अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडिल मृत्यूमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय, निमशासकीय, शासन अनुदानित आश्रमात न राहणारे मुले-मुलींना अनुज्ञेय असलेले लाभ मिळण्याच्या अनुषंगाने अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक तसेच संबंधित महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल.

दि.3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा कार्यक्रमात खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी अर्जदाराच्या मागणीनूसार पिक पेरा अहवाल, सातबारा अहवाल व 8-अ व विविध दाखल्यांचे वितरण करण्यात येईल. तसेच अतिवृष्टी व पुर अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येईल.

दि.4 ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमात महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येईल तसेच सलोखा योजना, गावागावातील व शेतातील रस्ते संबंधित प्रकरणे निकाली काढण्यात येतील. आपले सरकार पोर्टलवरील प्राप्त तक्रारी निकाली काढण्यात येतील. दि.5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रमातंर्गत संरक्षण दलातील अधिकारी, सैनिकांना निर्गमित होणाऱ्या विविध दाखल्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व समादेशक अधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात येईल. दि.6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद कार्यक्रमातंर्गत कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित सेवा विषयकबाबी निकाली काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. तर दि.7 ऑगस्ट रोजी सप्ताह कालावधीत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत समारोप करण्यात येईल. अशा भरगच्च कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे,  असे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ

 


 

जालना दि.31 (जिमाका) :- जिल्हयात विविध लोकोपयोगी विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जातो. या निधीतून कामे गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच हा निधी  वेळेत खर्च होईल, याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी.  तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिले.

जिल्हा नियोजनच्या सभागृहात आज जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 व 2022-23 मधील कामे आणि सन 2023-24 साठी प्रशासकीय मान्यतेचे परिपूर्ण प्रस्ताव, स्पील निधी याबाबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ म्हणाले की,  सन 2021-22 व 2022-23 मधील जी स्पीलमधील  प्रलंबित कामे आहेत, ती तातडीने पूर्ण करावीत.  जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांनी  याबाबत दक्षता घेऊन कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पध्दतीने पूर्ण करावीत. निधी अखर्चित राहता कामा नये. खर्चाच्या सर्व नोंदी आय-पास प्रणालीवर प्राधान्याने अपलोड कराव्यात. सन 2023-24 या चालू वर्षातील निधी वेळेत खर्च करण्यासाठी विभागप्रमुखांनी प्रस्तावास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन पुढील कामाची प्रक्रीयाही सुरु करावी. जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी खर्च होईल, याची सर्वच विभागप्रमुखांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी.  प्रलंबित कामांचा व खर्चाचा नियमितपणे आढावा घेतला जाईल, असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेसह सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला.

***

विश्वस्त संस्थांनी दंडाची रक्कम धर्मादाय आयुक्त कार्यालयात 30 ऑगस्टपर्यंत भरणा करावी अन्यथा कायदेशीर कार्यवाही

 


जालना दि.31 (जिमाका) :- ज्या विश्वस्तांनी कोरोना काळात व त्यानंतर ऑनलाईन हिशोबपत्रके विलंब माफीच्या अर्जासह ऑनलाईन भरून पावत्या सादर केल्या होत्या. त्या सर्व हिशोब पत्रांना दंड आकारण्यात येवून विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. मुदतीत दंड रक्कम भरणा न करणाऱ्या संस्थाच्या सर्व विश्वस्ताविरुद्ध विश्वस्त पदावरून बडतर्फी अथवा फौजदारी खटला दाखल करणे अथवा दोन्हीही प्रकारच्या कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सहायक धर्मादाय आयुक्त विनय मेंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

संस्थेची निवडणूक घेण्यास झालेल्या विलंबाबाबत कलम 41 अ अन्वये सादर केलेल्या अर्जावर परवानगी देताना दंड आकारण्यात येवून विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. परंतु अनेक संस्थांनी सदर दंडाची रक्कम धर्मादाय आयुक्त कार्यालयात भरणा केलेली नाही. अशा विश्वस्तांनी दि. 30 ऑगस्ट 2023 पर्यंत दंडाची रक्कम धर्मादाय आयुक्त कार्यालयात भरणा करून पावती घ्यावी, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

सैनिक व त्यांच्या अवलंबितासाठी 5 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे आयोजन

 


 

जालना दि.31 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक व अवलंबितांसाठी  महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने शनिवार दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी सर्व तालुक्यात आजी -माजी सैनिकांसाठी महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या उपक्रमाचा सैनिकांनी व त्यांच्या अवलंबितांनी सर्व कागदपत्रासह संबंधित तहसील कार्यालयात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश प्रकाश पाटील (नि.) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

सर्व संबंधित तहसीलदार व महसूल विभागाचे कर्मचारी हे दि.5 ऑगस्ट 2023 रोजी  आजी- माजी सैनिकांची महसूल संबंधित कामे करण्यासाठी तहसील कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. तरी शेतीच्या रस्त्यासबंधी, घरकुल, निवृत्ती वेतन नसलेल्यासाठी संजय गांधी निराधार योजना, निवृत्ती वेतन नसलेल्यासाठी श्रावण बाळ निराधार योजना, प्रलंबित फेरफार नोंदी महसूल संबंधी इतर तक्रारी, शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन, शिधापत्रिका, सातबारा आदि संदर्भातील  महसूल कामांचा यात समावेश असणार आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                        -*-*-*-*-

क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी क्रीडा संकुलास व निवासी प्रशिक्षण शिबीरास भेट देवून केली पाहणी

 


                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  

जालना दि.31 (जिमाका) :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना मार्फत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे विविध विकास कामे सुरू झालेली असून या कामास व जिल्हास्त़रीय क्रीडा शिक्षक निवासी प्रशिक्षण शिबीरास शनिवार दि. 29 जुलै 2023 रोजी क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील यांनी भेट देवून पाहणी केली.

जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथील क्रीडा सुविधाच्या विकास कामास भेट देऊन नियुक्त खाजगी वास्तुविशारद शशी प्रभु ॲण्ड असोसिएटसचे धीरज शर्मा व कंत्राटदार धर्मित घिंया यांच्याशी चर्चा करून विकास कामाचा आढावा घेतला व उच्चतम दर्जाचे काम करण्यास व सुरु असलेल्या विकास कामाची गती वाढविण्याबाबत योग्य त्या सूचना केल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रीडा संघटक पी.जे.चाँद, प्रशांत डोली, गणेश विधाते आदिची उपस्थिती होती. 

सकाळच्या सत्रात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू असलेले जिल्हास्त़रीय क्रीडा शिक्षक निवासी प्रशिक्षण शिबीरास  जे. ई. एस. महाविद्यालय, जालना येथे सकाळी 10.30 वाजता भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले.  मार्गदर्शन करतांनी श्री. पाटील यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी त्यांचा दर्जा उंचावून सदर शिबीराचा लाभ जिल्ह्यामध्ये देऊन जिल्ह्यात क्रीडा विकास वाढवावा व क्रीडा संस्कृती रूजवावी असे सांगितले. यावेळी जे.ई.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीचे प्रमोद खरात, क्रीडा संघटक पी.जे. चॉद, प्रशांत नवगिरे, प्रशांत डोली, युवराज गाडेकर, शेख मतीन, नितीन जाधव, योगगुरू डॉ. चेतनकुमार भागवत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. असे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

Thursday 27 July 2023

महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणार विविध कार्यक्रम

 

1 ऑगस्ट रोजी महसूल दिन


 

जालना दि.27 (जिमाका) :-  जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम नियोजित आहेत. महसूल दिनानिमित्त 1 ऑगस्ट पासून ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी महसूल विभागाशी संबंधित कामकाजाविषयी आपापल्या तालुक्यातील शिबीराच्या माध्यमातून लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महसूल सप्ताहानिमित्त दि.1 ऑगस्ट 2023 रोजी महसूल दिन साजरा व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येईल. यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येवून सन्मानित करण्यात येईल. तसेच नागरिकांकडून दाखल सर्व प्रकरणे ई-हक्क पोर्टलवर तलाठ्यांमार्फत, सेतूसुविधा केंद्रामार्फत नोंदी घेण्यात येतील. यावर तहसीलदार व नगरभूमापन अधिकारी दुरुस्तीचे आदेश पारित करतील. गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येईल.

दि.2 ऑगस्ट रोजी युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. यात दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास, उत्पन्न, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करणे व पात्र उमेदवारांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल. अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडिल मृत्यूमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय, निमशासकीय, शासन अनुदानित आश्रमात न राहणारे मुले-मुलींना अनुज्ञेय असलेले लाभ मिळण्याच्या अनुषंगाने अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक तसेच संबंधित महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल.

दि.3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा कार्यक्रमात खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी अर्जदाराच्या मागणीनूसार पिक पेरा अहवाल, सातबारा अहवाल व 8-अ व विविध दाखल्यांचे वितरण करण्यात येईल. तसेच अतिवृष्टी व पुर अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येईल.

दि.4 ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमात महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येईल तसेच सलोखा योजना, गावागावातील व शेतातील रस्ते संबंधित प्रकरणे निकाली काढण्यात येतील. आपले सरकार पोर्टलवरील प्राप्त तक्रारी निकाली काढण्यात येतील. दि.5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रमातंर्गत संरक्षण दलातील अधिकारी, सैनिकांना निर्गमित होणाऱ्या विविध दाखल्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व समादेशक अधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात येईल. दि.6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद कार्यक्रमातंर्गत कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित सेवा विषयकबाबी निकाली काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. तर दि.7 ऑगस्ट रोजी सप्ताह कालावधीत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत समारोप करण्यात येईल. अशा भरगच्च कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे,  असे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

नागरिकांना अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 


 

जालना दि.27 (जिमाका) :-  घनसावंगी पोलिस ठाणे हद्दीतील बोलेगाव शिवारातील शेती गट क्र.184 मधील विहीरीमध्ये एका अनोळखी अंदाजे 30 ते 35 वर्ष वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. तरी या वर्णनाच्या अनोळखी पुरुषासंबंधी काही माहिती असल्यास पोलिस ठाणे, घनसावंगी यांना माहिती द्यावी, असे आवाहन घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी.डी.डोलारे यांनी केले आहे.

घनसावंगी पोलिस ठाणे यांनी मरणोत्तर पंचनामा करुन या पुरुषाच्या मृतदेहावर ग्रामीण रुग्णालयात दि.20 जुलै 2023 रोजी पोस्टमार्टम करण्यात आले आहे. या प्रकरणी दि.20 जुलै रोजी पोलिस पाटील विलास देविदास आर्दड वय 55 वर्ष यांनी  दिलेल्या खबरीवरुन आमृ 31/2023 कलम 374 सीआरपीसीप्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुरुषाचा मृतदेह अंदाजे उंची 5 फुट असून अंगात मेंहदी रंगाचा फुल शर्ट ज्याचे कॉलरवर इंग्रजीमध्ये लेव्ही एस एम 38 असे लिहीलेले आहे. तर निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व इटकरी रंगाची अंडवियर असून त्यावर इंग्रजीमध्ये डॉलर असे छापील आहे. तसेच पायात राखाड्या रंगाचा सँडल असून ज्यावर स्पोर्ट असे लिहीलेले आहे. तरी या वर्णनाच्या अनोळखी पुरुषासंबंधी काही माहिती असल्यास किंवा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार असल्यास किंवा गुन्हा दाखल असल्यास पोलिस ठाणे घनसावंगी यांना माहिती द्यावी. माहिती देण्यासाठी पोलिस निरीक्षक पी.के.महाजन (मो.9821729223), पोलिस उपनिरीक्षक पी.डी.डोलारे (मो.8605103703), हेड काँस्टेबल श्री.वैराळ (मो.8668703254) यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलिस उपनिरीक्षक, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Wednesday 26 July 2023

जालना जिल्ह्यात 7 ऑगस्टपासून “विशेष मिशन इंद्रधनुष 5.0” लसीकरण मोहिम लसीकरणापासून वंचित राहिलेले बालक, गरोदर मातांनी लसीकरण अवश्य करुन घ्यावे -- मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना - तीन टप्प्यात राबविण्यात येणार मोहिम

 




 

जालना दि.26 (जिमाका) :-  लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे व गरोदर मातांच्या लसीकरणासाठी जालना जिल्हयात दि. 7 ऑगस्ट 2023 पासून विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 ही मोहिम तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. ही मोहिम आरोग्य विभागाने प्रभावीपणे व जबाबदारीने राबवावी. लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी,  अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केली. तर लसीकरणापासून वंचित राहिलेले बालक व गरोदर मातांनी या मोहिमेतंर्गत लसीकरण अवश्य करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी  केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज  विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी श्रीमती मीना बोलत होत्या. बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) कोमल कोरे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन म्हस्के समाज कल्याण अधिकारी डॉ. कांबळे, शिक्षणाधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

बालकांमधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यु पावतात. तसेच केंद्र शासनाने डिसेंबर 2023 पर्यत गोवर रुबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी केंद्र शासनाने माहे ऑगस्ट 2023 पासून तीन फेऱ्यांमध्ये सर्व जिल्हयांमध्ये "विशेष मिशन इंद्रधनुष 5.0" कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेले सर्व बालकं व गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केले जाणार आहे.  ही मोहिम आगामी तीन महिन्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.  पहिला टप्प्याचा कालावधी दि. 7 ते 12 ऑगस्ट 2023, दुसऱ्या टप्प्याचा कालावधी दि. 11 ते 16 सप्टेंबर 2023 आणि तिसऱ्या टप्प्याचा कालावधी दि. 9 ते 14 ऑक्टोबर 2023  असा राहणार आहे.

लाभार्थ्यांची निवड -- 0 ते 2 वर्ष (0 ते 23 महिने) वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या बालकांचे सर्व लसीद्वारे लसीकरण करणे. 2 ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बुस्टर डोस राहिला असेल त्यांचे लसीकरण करणे. गर्भवती महिला यांचे लसीकरण करणे आणि दि. 6 ऑगस्ट 2018 किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचे मोहिमेतंर्गत लसीकरण केले जाणार आहे.

 या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणात झिरो डोस, सुटलेले व वंचित राहिलेले लाभार्थी असलेले क्षेत्र, गोवर आजारासाठी अति जोखमीचे क्षेत्र, नियमित लसी कार्यक्रमातंर्गत नवीन लसीचा समावेश केल्यानंतर कमी काम असलेले क्षेत्र, स्थलांतरीत होणाऱ्या झोपडपट्टया व स्थायी शहरी व शहराला लागून असणाऱ्या झोपडपट्टीचा भाग, गोवर, घटसर्प व डांग्या खोकल्याचे सन 2022-23 या वर्षातील उद्रेकग्रस्त भाग, लसीकरणास नकार देणारे, प्रतिसाद न देणारे क्षेत्र यावर विशेष लक्ष केंद्रीत करुन लसीकरण केले जाणार आहे.  "विशेष मिशन इंद्रधनुष 5.0" या मोहिमेतंर्गत लसीकरण सत्र हे प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र, शाळा येथे आयोजित केले जाणार आहेत. तर अतिदुर्गम व विखुरलेल्या लोकसंख्येकरीता जसे  डोंगराळ भागातील वस्त्या, पाडे या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लसीकरण केले जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, "विशेष मिशन इंद्रधनुष 5.0" ही शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेले सर्व बालक व गरोदर माता वंचित राहणार, याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. मोहिमेची मोठया प्रमाणात प्रचार-प्रसिध्दी करावी. शिक्षण विभागाने रॅलीव्दारे जनजागृती करावी. जोखमीचा भाग आणि लसीकरणास नकार देणारे किंवा प्रतिसाद न देणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांना बालक व गरोदर मातांच्या लसीकरणासाठी प्रोत्साहीत करावे. कामानिमित्त आपल्या जिल्हयातून स्थलांतरीत झालेली कुटुंब आणि इतर जिल्हयातून आलेली कुटुंब याची माहिती घेऊन लाभार्थ्यांना लसीकरण करावे. लसीकरण सत्राच्या कालावधीत  लसीचा तुटवडा भासणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करुन मोहिम समन्वयाने व जबाबदारीने यशस्वी करावी.

"विशेष मिशन इंद्रधनुष 5.0" या मोहिमेबद्दल डॉ. जयश्री भुसारे आणि डॉ. गजानन म्हस्के यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली.

-*-*-*-*-*-

 

 

जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन

 

 

जालना दि.26 (जिमाका) :-   महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये जालना जिल्हयात दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2023 दरम्यान महसूल दिन व महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.  महसूल विभागामार्फत जिल्हास्तरीय महसूली कामे वेळेच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे, इ. कामे वेळेत व वेळापत्रकानुसार करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा तसेच महसूली वसुलीचे उद्दीष्ट पार करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करणे तसेच महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दरवर्षी दिनांक 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून जिल्हयात साजरा करण्यात येत आहे.

 

महसूल विभागाकडून देण्यात येणा-या विविध शासकीय सेवा आणि विभागाकडुन राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरीकांना अधिकाधिक माहिती होण्यासाठी व त्यांचा योग्य लाभ घेता यावा यासाठी तसेच याबाबत नागरीकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरीकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम दि.1 ऑगस्ट 2023  या महसूल दिना पासुन 7 ऑगस्ट 2023 या दरम्यान महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे.

 

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतजिल्ह्यातील उपविभागीयस्तर/तालुकास्तरावरविशेष मोहिम/कार्यक्रम/शिबीर/महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी महसूल विभागाशी संबंधित कामकाजाचा आपापल्या तालुक्यातील शिबीराच्या माध्यमातुन लाभ घ्यावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-*-

 

श्री सरस्वती भुवन प्रशाला येथे चित्रकला स्पर्धा संपन्न

 


जालना, दि. 26 (जिमाका):-  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयातंर्गत नेहरू युवा केंद्र जालनाच्या वतीने व युवा सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने श्री. सरस्वती भुवन प्रशाला, जालना येथे चित्रकला स्पर्धां पार पडली यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

कॅच द रेन 3.0 या पाऊस पाणी संकलन या संकल्पनेची माहिती शालेय विद्यार्थिनी यांच्या मार्फत समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी  चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.  यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना जलशपथ देण्यात आली. पाण्याचे महत्व, पाऊस पाणी संकलन, पाणी हेच जीवन, पाऊस आलाच नाही तर? आणि पाणी व सृष्टी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम कु.भावना तौर, द्वितीय कु.श्रावणी राजेंद्र तर तृतीय कु.स्नेहल खोडके या विद्यार्थींनींनी क्रमांक पटकावला त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

राष्ट्रीय लोकअदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन

 


 

जालना, दि. 26 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची  वसूली प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची  प्रकरणे, इलेक्ट्रीसिटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व तर प्रकरणे तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणे, इत्यादी प्रकरणासाठी दि. 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.   तरी सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घेवून आपली प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन श्रीमती पी.पी.भारसाकडे-वाघ, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

जालना येथील गुजराती विद्यालयात मुलांसाठी कायदेविषयक शिबीर संपन्न

 

 

जालना, दि. 26 (जिमाका) :- जिल्हा‍ विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सी.टी.एम.के. गुजराती विद्यालयात मुलांसाठी कायदेविषयक शिबीर संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, यांच्यासह उपपोस्ट मास्तर यु.पी.कुलकर्णी, बार्टीच्या समतादुत अनिता बोडखे, ॲङ महेश धन्नावत, मुख्याध्यापक सतिश देशमुख आदीची उपस्थिती होती.

यावेळी श्रीमती भारसाकडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा-2012 याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अमोल स्वामी यांनी भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत योजनांची माहिती दिली. समतादूत श्रीमती बोडखे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. बालकांचे हक्क आणि अधिकार काय आहेत याविषयी ॲड धन्नावत यांनी माहिती दिली.

-*-*-*-*-

वृत्त क्र.493                                                              

जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायद्याविषयी जनजागृती

 


जालना, दि. 26 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य  उत्पादने प्रतिबंध कायदा 2003 बाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठवाडा ग्रामीण संस्थेचे विभागीय अधिकारी अभिजित संगई, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा‍ सल्लागार डॉ.संदिप गोरे यांची होती.  

यावेळी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास कार्यालयात प्रतिबंध घालण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी यावेळी नमूद केले. तर प्रमुख वक्ते विभागीय अधिकारी अभिजित संगई यांनी सिगारेट व तंबाखूजन्य  उत्पादने प्रतिबंध कायद्याबाबत सविस्तर माहिती देवून जनजागृती केली. यावेळी डॉ.गोरे यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यास त्याचे मानवी शरीरावर काय परिणाम होतात याची माहिती देवून न्यायालयाचे कर्मचारी व पक्षकारांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास वरिष्ठांनी प्रतिबंध करावा असे सांगितले. यावेळी श्री.संगई यांनी उपस्थितांना तंबाखू सेवन विरोधी शपथ दिली.

-*-*-*-*-

जिल्ह्यातील इतर मागासवर्गीयांनी विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 


जालना, दि. 26 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळाकडून इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. तरी जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या तसेच 18 ते 50 वर्षादरम्यान वय असणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांनी सन 2023-24 वर्षासाठी ऑनलाईन www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवगी्रय वित्त्‍त आणि विकास मंडळाकडून इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी थेट कर्ज योजना, 20 टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य प्रशिक्षण व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना राबविण्यात येतात. तरी जिल्ह्यात 20 टक्के बीज भांडवल योजनेकरीता राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज प्रकरणासाठी तसेच थेट कर्ज योजना 1 लाख रुपयांसाठी अर्ज विक्री अर्ज संपेपर्यंत चालु राहणार आहे. तरी जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, वयाचा दाखला इत्यादी कागदपत्राच्या सत्यप्रती अर्ज खरेदी करताना कार्यालयात दाखल करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवगी्रय वित्त्‍त आणि विकास मंडळ मर्यां. , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला, जालना येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवगी्रय वित्त्‍त आणि विकास मंडळ, मर्या. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Tuesday 25 July 2023

जालना जिल्ह्यात 26 जुलै रोजी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता 27 ते 29 जुलै दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

 

 

     जालना दि. 25 (जिमाका) :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 25 जुलै 2023 रोजी यलो अलर्ट जारी केला असुन या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची व ताशी 30 ते 40 कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहण्याची  शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 27 ते 29 जुलै 2023 या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधीत यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, खबरदारीची उपाययोजना म्हणून खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

 

       हे करावे :- विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

         हे करु नका :-आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.धातूंच्या उंच मनो-याजवळ उभे राहू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) केशव नेटके यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

Monday 24 July 2023

 


                             

  

जालना, दि.24 (जिमाका) :-  खेळाडूंना नियमिपणे खेळण्यासाठी मैदानासह इतर प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता प्रशासनाकडून निश्चितपणे प्रयत्न केले जातील. तसेच कुठलाही खेळाडू खेळाच्या सुविधांपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी  दिली.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यामाने जेईएस महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, प्राचार्य गणेश अग्निहोत्री, क्रीडा संघटक तथा तज्ञ प्रशिक्षक पी.जे.चाँद,  प्रशांत नवगिरे, क्रीडा अधिकारी  रेखा परदेशी, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, महमंद शेख, सोपान शिंदे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, खेळातसुध्दा उत्तम करियर करता येवू शकते, पण याबाबत अनेक कुटूंबांत आजही पाहिजे तशी स्विकारर्हता नाही. मात्र खेळातूनही चांगले करियर घडविलेले अनेक व्यक्तीमत्व आपल्यासमोर आदर्श म्हणून आहेत. खेळाडू हा कधीही तरुणच राहतो तो वृध्दामध्ये गणला जात नाही. दहा दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक निवासी प्रशिक्षणातून तयार झालेल्या  क्रीडा शिक्षकांनी आपल्या या प्रशिक्षणातील अनुभवाच्या जोरावर  विविध खेळ प्रकारात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू तयार करण्याचे कार्य करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व असून शिक्षकांनी विविध क्रीडा प्रशिक्षण प्रकारात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.  जिल्हा परिषदेकडून जिल्हा परिषदेची निवासी क्रीडा प्रबोधिनी सुरु आहे. त्यात 100 मुलांना प्रशिक्षण देण्यात येते. या प्रबोधिनीतील खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. ‍शिबीरात प्रशिक्षण घेतलेल्या क्रीडा शिक्षकांनी उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे कार्य करावे.

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विद्यागर यांनी  प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, सध्या पारंपारिक खेळासोबतच नवनवीन खेळांचे प्रकार आले आहेत.  तंत्रज्ञानाच्या या जगात खेळात व खेळाच्या धोरणात विविध बदलही घडून आले आहेत. हे बदल क्रीडा शिक्षकांना माहिती व्हावेत यासाठी  जिल्ह्यातील 100 शिक्षकांना निवासी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरातून प्रशिक्षीत होवून जिल्ह्याचा क्रीडा आलेख उंचावण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी कार्य करावे. कार्यक्रमास क्रीडा शिक्षक व जेईएस महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

 

पिक विमा योजनेची जिल्ह्यात 5 वाहनांद्वारे जनजागृती; जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दाखविली हिरवी झेंडी



 

जालना, दि. 21 (जिमाका):-  प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्यात सर्व समावेशक पिक विमा योजना खरीप हंगाम सन  2023-24 राबविण्यात येत  असून जिल्ह्यामध्ये ही योजना युनिव्हर्सल सोंम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत राबविण्यात येत आहे. एक रुपयामध्ये पिक विमा योजनेची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी फलकावर माहितीसह ध्वनी संदेश लावून तयार करण्यात आलेल्या 5 जनजागृतीपर वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी आज हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणाले की, सर्व शेतकऱ्यांना यावर्षीपासून केवळ एका रुपयात पिक विमा योजनेचा लाभ देण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांनी यात सहभागी होवून आपल्या पिकांना संरक्षित करावे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेची एकुण 5 वाहनाद्वारे जिल्ह्यातील विविध मंडळात जावून पुढील जवळपास 10 दिवस प्रसिध्दी केली जाणार आहे. पिक विम्याचा लाभ केवळ एक रुपयात दिला जात असून अतिरिक्त पैशाची मागणी करणाऱ्या केंद्र चालकांविरुध्द तक्रार प्राप्त होताच त्यावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. आजपर्यंत जिल्ह्यात जवळपास 7 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून उर्वरित शेतकऱ्यांनी पिक विमा भरावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

-*-*-*-*-

जिल्ह्यातील खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ जिल्हास्तर क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे थाटात उद्घाटन

   





                             

  

जालना, दि.24 (जिमाका) :-  खेळाडूंना नियमिपणे खेळण्यासाठी मैदानासह इतर प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता प्रशासनाकडून निश्चितपणे प्रयत्न केले जातील. तसेच कुठलाही खेळाडू खेळाच्या सुविधांपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी  दिली.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यामाने जेईएस महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, प्राचार्य गणेश अग्निहोत्री, क्रीडा संघटक तथा तज्ञ प्रशिक्षक पी.जे.चाँद,  प्रशांत नवगिरे, क्रीडा अधिकारी  रेखा परदेशी, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, महमंद शेख, सोपान शिंदे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, खेळातसुध्दा उत्तम करियर करता येवू शकते, पण याबाबत अनेक कुटूंबांत आजही पाहिजे तशी स्विकारर्हता नाही. मात्र खेळातूनही चांगले करियर घडविलेले अनेक व्यक्तीमत्व आपल्यासमोर आदर्श म्हणून आहेत. खेळाडू हा कधीही तरुणच राहतो तो वृध्दामध्ये गणला जात नाही. दहा दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक निवासी प्रशिक्षणातून तयार झालेल्या  क्रीडा शिक्षकांनी आपल्या या प्रशिक्षणातील अनुभवाच्या जोरावर  विविध खेळ प्रकारात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू तयार करण्याचे कार्य करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व असून शिक्षकांनी विविध क्रीडा प्रशिक्षण प्रकारात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.  जिल्हा परिषदेकडून जिल्हा परिषदेची निवासी क्रीडा प्रबोधिनी सुरु आहे. त्यात 100 मुलांना प्रशिक्षण देण्यात येते. या प्रबोधिनीतील खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. ‍शिबीरात प्रशिक्षण घेतलेल्या क्रीडा शिक्षकांनी उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे कार्य करावे.

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विद्यागर यांनी  प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, सध्या पारंपारिक खेळासोबतच नवनवीन खेळांचे प्रकार आले आहेत.  तंत्रज्ञानाच्या या जगात खेळात व खेळाच्या धोरणात विविध बदलही घडून आले आहेत. हे बदल क्रीडा शिक्षकांना माहिती व्हावेत यासाठी  जिल्ह्यातील 100 शिक्षकांना निवासी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरातून प्रशिक्षीत होवून जिल्ह्याचा क्रीडा आलेख उंचावण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी कार्य करावे. कार्यक्रमास क्रीडा शिक्षक व जेईएस महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

माजी सैनिकांना कारगील विजय दिवसाच्या औचित्याने वृक्षारोपण करण्याचे आवाहन


 

जालना, दि. 24 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील माजी सैनिकांनी गावपातळीवर ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहभागाने बुधवार      दि. 26 जुलै 2023 रोजी वृक्षारोपण करावे, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जालना जिल्ह्यातील माजी सैनिकांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सुचनेनूसार जालना जिल्ह्यातील माजी सैनिकांमध्ये जोश व त्यांची त्यांच्या गावामधील प्रशासनासोबत सलोख्याची भावना वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने गावपातळीवर ग्रामपंचायत प्रशासन व माजी सैनिक यांच्या सहभागाने कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून दि. 26 जुलै 2023 रोजी वृक्षारोपण करावे असे कळविले आहे. तरी जिल्ह्यातील माजी सैनिकांनी आपापल्या ग्रामपंचायतीसह वृक्षारोपण करुन  वृक्षारोपण कार्यक्रमाच्या छायाचित्रासह अहवाल माजी सैनिकांच्या नावासह व सरपंचाच्या स्वाक्षरीनिशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दि. 27 जुलै 2023  पर्यंत सादर करावा. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन गावातील माजी सैनिक समुहाला रोख पारीतोषिक देण्यात येणार आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Friday 21 July 2023

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे आवाहन गटई कामगारांनी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेतील त्रुटीची पुर्तता करावी


 

जालना, दि. 21 (जिमाका):- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वितरण योजनेअंतर्गत मुदतवाढ देवून दि.19 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तरी गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेअंतर्गतच्या अर्जाची छाननी केली असता त्र्रुटी दिसून आल्या आहेत. या त्रुटीच्या पुर्ततेसाठी संबंधित लाभार्थ्यांची यादी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सुचना फलकावर चिटकविण्यात आली आहे. तरी संबंधितांनी त्रुटीची पूर्तता कार्यालयीन वेळेत दि.10 ऑगस्ट 2023 पर्यंत  करावी,  असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-