Wednesday 12 July 2023

श्री गजानन महाराज दिंडीसाठी वाहतुक मार्गात बदल; 14 ते 15 जुलै दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करावा

 

      जालना, दि.12 (जिमाका) :-   श्री. गजानन महाराज संस्थान शेगाव श्री ची पालखी पायदळवारी पालखी, परंपरेनुसार पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर असुन  या दिंडीमध्ये 1000/1500 वारकरी सहभागी आहेत. पायी दिंडी ही दि. 14 जुलै 2023 रोजी जालना शहरात प्रवेश करणार असून दि. 14 जुलै रोजी ते 15 जुलै 2023 पर्यंत कदिम जालना व सदर बाजार हद्दीत मुक्कामी राहून दि. 16 जुलै 2023 रोजी नाव्हामार्गे  सिंदखेडराजा, जि. बुलढाणाकडे प्रयाण करणार आहे.

     या दिंडीचे दर्शन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असुन अवजड वाहनांच्या रहदारीमुळे शुल्लक बाबी वरुन विवादीत परिस्थिती निर्माण  होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायी दिंडीतील भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षीततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी सदर मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे.

     त्याअर्थी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये जालना शहरात येणारी व जाणारी अवजड वाहनांना दि. 15 जुलै  रोजी  सकाळी 6.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खालील नमुद पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे असे आदेश पोलीस अधिक्षक,  तुषार दोशी यांनी जारी केले आहेत.

     बसस्थानकाकडून सुभाष चौकामार्गे छत्रपती शिवाजी जुना जालन्यात जाणारी वाहतुक लक्कडकोट बाजीराव पेशवे जातील व येईल. बस स्थानकाकडून  पाणीवेस काद्राबाद चौकी मार्गे मंगळ-बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहतुक ही भोकरदन नाका कन्हैयानगर मार्गे बायपास रोडने जाईल व येईल. बस स्थानकाकडून मामाचौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणारी वाहतुक ही भोकरदन नाका कन्हैयानगर मार्गे बायपास रोडने जाईल व येईल. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाकडुन टांगा स्टँड मार्गे तसेच पाणीवेश मार्गे बसस्थानक व जुना जालना जाणारी वाहतुक ही शिवाजी पुतळा चौका जवळुन रामनगर मार्गे बायपास रोडने अंबड चौफुली मार्गे जाईल व येईल. मंगळ बाजार- काद्राबाद चौकी परिसरातील सुभाष चौकातुन जुना जालनाकडे जाणारी वाहतुक ही मंगळ बाजार – चमडा बाजार- राजमहल टॉकीज पुलावरुन जुना जालन्यात जाईल व येईल. रेल्वे स्टेशन – गांधीचमन कडून मंमादेवी – सुभाष चौक मार्गे नवीन जालन्यामध्ये येणारी वाहतुक ही मंमादेवी चौकातुन एमएसईबी ऑफीस – राजमहल टॉकीज पुल – चमडा बाजार मार्गे जाईल व येईल.

 वरील मार्गाची अवजड वाहतुकीमध्ये दि. 15 जुलै 2023 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी. हा आदेश दि. 15 जुलै 2023 रोजीच्या सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घेण्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आदेशीत केले आहे.

 

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment