Friday 14 July 2023

चालु शैक्षणिक वर्षासाठी आदिवासी वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

 

 

     जालना, दि.14 (जिमाका) :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद प्रकल्पाअंतर्गंत शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षातील प्रवेश प्रक्रिया दि. 1 जुन 2023 पासुन सुरु झालेली असून वसतीगृह क्षमता 2 हजार 775 च्या अनुषंगाने रिक्त असलेल्या 1 हजार 352 जागानुसार ऑनलाईन प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जामधील पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींना प्रवेश देण्याची कार्यवाही वसतीगृह स्तरावर सुरु आहे. विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत तसेच अर्ज केल्यानंतर संबंधित गृहप्रमुख, गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन औरंगाबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह प्रवेश योजना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद प्रकल्पाअंतर्गंत येणाऱ्या  औरंगाबाद, जालना, बीड  व लातूर या चार जिल्ह्यातील 14 वसतिगृहामध्ये जमातीच्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना तालुकास्तरावर इयत्ता आठवी पासून पुढील प्रवेशाकरीता व जिल्हास्तरावर इयत्ता अकरावीपासून नंतरच्या शिक्षणाकरीता शासकीय वसतिगृहात प्रवेश योजना पात्र विद्यार्थी व विद्यार्थींनींकरीता शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षातील प्रवेश प्रक्रिया दि. 1 जुन 2023 पासुन सुरु झालेली असून वसतीगृह क्षमता 2 हजार 775 च्या अनुषंगाने रिक्त असलेल्या 1 हजार 352 जागानुसार ऑनलाईन प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जामधील पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींना प्रवेश देण्याची कार्यवाही वसतीगृह स्तरावर सुरु आहे. त्याअनुषंगाने सन 2023 -24 करीता पालकांचे घोषणापत्र नमुना आणि विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना खालील लिंकमध्ये देण्यात आलेल्या सुचनांची खबरदारी घेण्यात यावी. वसतिगृह प्रवेशासाठी संकेत स्थळ सुरु करण्यात आलेले असून विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा तसेच अर्ज भरल्यानंतर संबंधित गृहप्रमुख, गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.  

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment