Friday 14 July 2023

राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत

 

 

जालना, दि.14 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालयाने तेनझिंग नॉगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार वितरीत करण्याकरिता नामांकनाचे प्रस्ताव पाठविण्याबाबत सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील साहसी खेळाडूंनी शासनाच्या https://awards.gov.in संकेतस्थळावरून आवश्यक माहिती प्राप्त करून तेनझिंग नॉगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार- 2022 साठी ऑनलाईन  प्रस्ताव सादर करावेत,  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

तेनझिंग नॉगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2022 साठी केंद्र शासनास शिफारस करण्यासाठी  नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षामधील म्हणजे सन 2020, 2021 व 2022 मधील असणे आवश्यक आहे.  साहसी उपक्रम हे जमीन, पाणी व हवेमधील असावेत.  खेळाडूची कामगिरी अतिउत्कृष्ट असावी. याप्रमाणे खेळाडूची कामगिरी व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तरी तेनझिंग नॉगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2022 करिता प्रस्ताव शासनाच्या https://awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर स्विकारण्यात येणार आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment