Thursday 13 July 2023

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कोषागार कार्यालयात वेतन पडताळणी दौरा कार्यक्रम

 

 

        जालना (जिमाका) दि. 14 :- सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन पडताळणी पथकाचा माहे जुलै-2023 चा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजीत केला असून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन पडताळणी ही संगणकीय प्रणालीद्वारे (Vetanika)  होणार आहे. 

     जिल्हा कोषागार कार्यालय, जालना  येथे दि. 17 जुलै 2023 ते 19 जुलै 2023 दौरा आयोजित करण्यात आला आहे.

    दौऱ्याच्या ठिकाणी दि. 1 जानेवारी 2019 नंतर सेवानिवृत्त झालेले तसेच दि. 31 डिसेंबर 2030 पर्यंत सेवानिवृत्त होणारे कर्मचारी/ अधिकारी तसेच न्यायालयीन/मयत/लोकायुक्त प्रकरणे यांच्या सेवापुस्तकास प्राधान्य देण्यात येईल.

सेवापुस्तक  शासन निर्णयानुसार परीपुर्ण पुर्तता करुन  जोडपत्र सेवापुस्तकात जोडणे आवश्यक आहे, सेवापुस्तके पडताळणीसाठी दाखल करताना शासन निर्णय वित्त विभागानुसार वेतनिका प्रणालीमार्फत वेतन पडताळणी पथकाकडे तपासणीसाठी सादर करायचे आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार मिळालेली पदोन्नती नाकारली असल्यास तसेच कालबध्द/आप्रयोचा लाभ दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांनी त्यानंतर प्रत्यक्ष दिलेली पदोन्नती नाकारली असल्यास त्याबाबतची नोंद मुळ सेवापुस्तकात घेणे आवश्यक आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे, औरंगाबाद विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment