Thursday 20 July 2023

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एका रुपयात पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

 

 

जालना, दि. 20 (जिमाका) :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात सर्व समावेशक पिक विमा योजना खरीप हंगाम सन  2023-24 राबविण्यात येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये ही योजना युनिव्हर्सल सोंम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एका रुपयात पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पिक विमा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तंत्र अधिकारी राजेंद्र गावित,रवी इंदोरिया, युनिव्हर्सल सोम्पोचे राज्य व्यवस्थापक उज्वल कुमार व रत्नेश कुमार उपस्थित होते.  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी यांचा आढावा घेतला. यावेळी एक रुपयात पिक विमा योजनेचे प्रचार प्रसिद्धीबाबत काटेकोर नियोजन करून जास्तीत जास्त शेतकऱ्याना सहभागी करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या.जे सीएससी केंद्रचालक जास्त पैसे घेत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करून परवाना रद्द करण्याबाबत निर्देश दिले.  

नोंदणीकृत भाडे करार न करता  खोट्या भाडे पट्टीने दुसऱ्याच्या नावावर विमा भरणाऱ्या शेतकरी व सहभागी सीएससी केंद्र चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. विमा कंपनीची जिल्हा व तालुकास्तरावर सर्व कार्यालय सर्व सुविधांसह चालू करण्याचे निर्देश देण्यात आले. विमा कंपनीचे प्रतिनिधी   व कार्यालयाचा पत्ता याबाबत शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करुन देण्याची सुचनाही यावेळी करण्यात आली. पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पेरणी किंवा लावणी न होणे, काढणी पश्चात नुकसान, पीक कापणी प्रयोगाच्या आधारे येणारी उत्पादनातील घट इत्यादींना संरक्षण देण्यात आले आहे.

·         युनिव्हर्सल सोम्पो विमा कंपनीचे जिल्हा व तालुकास्तरीय नियुक्त प्रतिनिधींची माहिती

   जालना जिल्हा समन्वयक म्हणून राजेश साबळे (मो.8976298999), उज्वल कुमार (मो.7491809845), रत्नेश कुमार (मो.8779636349) आणि शेख आरिफ (मो.9765471646) यांना नियुक्त करण्यात आले असून त्यांचे कार्यालय सुपारकर कॉम्पलेक्स, रिलायन्स मार्टजवळ जालना येथे आहे. बदनापूर तालुका समन्वयक म्हणून विजय बोहाटे (मो.8007351600) यांना नियुक्त करण्यात आले असून त्यांचे कार्यालय मोरया कॉर्नर, शिवतारा हॉस्पिटल, महाराज हॉटेलजवळ, बदनापूर येथे आहे. मंठा तालुका समन्वयक म्हणून योगेश जाधव (मो.7774936085) यांना नियुक्त करण्यात आले असून त्यांचे कार्यालय मोरे कॉम्पलेक्स, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाजवळ, जालना रोड, मंठा येथे आहे. घनसावंगी तालुका समन्वयक म्हणून सुदर्शन जाधव (मो.8007020867) यांना नियुक्त करण्यात आले असून त्यांचे कार्यालय अष्टांग कॉम्पलेक्स, तहसील कार्यालयाजवळ, घनसावंगी येथे आहे. परतूर तालुका समन्वयक म्हणून हरिओम गोरे (मो.8308998331) यांना नियुक्त करण्यात आले असून त्यांचे कार्यालय एलबीएस महाविद्यालय रोड, आदर्श कॉलनी, मराठा क्रांती भवनाजवळ, परतूर येथे आहे. जालना तालुका समन्वयक म्हणून त्र्यंबकेश्वर मोरे (मो.7972925979) यांना नियुक्त करण्यात आले असून त्यांचे कार्यालय सुपारकर कॉम्पलेक्स, रिलायन्स मार्टजवळ, जालना येथे आहे.  भोकरदन तालुका समन्वयक म्हणून अलिम शेख (मो.9049134849) यांना नियुक्त करण्यात आले असून त्यांचे कार्यालय गुरुकृपा कॉम्पलेक्स, बस स्थानकाजवळ, भोकरदन येथे आहे. जाफराबाद तालुका समन्वयक म्हणून अशपाक शेख (मो.9112831062) यांना नियुक्त करण्यात आले असून त्यांचे कार्यालय बाजार गल्ली, बस स्थानकाजवळ, जाफराबाद येथे आहे. तर अंबड तालुका समन्वयक म्हणून मोरेश्वर गवळी (मो.7620102571) यांना नियुक्त करण्यात आले असून त्यांचे कार्यालय बीएचआर कॉम्पलेक्स, शिवसेना भवन दुसरा मजला, अंबड येथे आहे. असे  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.477                                                             

No comments:

Post a Comment