Thursday 20 July 2023

नेहरू युवा केंद्राकडून कॅच द रेन अंतर्गत कार्यक्रम संपन्न

 



 

जालना, दि. 20 (जिमाका) :- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेले नेहरू युवा केंद्र जालनाच्या वतीने जलशक्ती मंत्रालय अंतर्गत कॅच द रेन 3.0 चे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हाभरातील स्वयंसेवकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवित कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.  

परतूर तालुक्यामध्ये स्वयंसेवक रुपाली भापकर, जाफ्राबाद येथे अजय पैठणे व शुभम शुक्ला, भोकरदन येथे तैय्यबा शाह तर जालना शेवली येथे पठाण रुक्सर या तालुक्यातील सर्व स्वयंसेवकांनी पाण्याचा साठा कशा पद्धतीने केला जाईल व जास्त पावसामुळे कंपाऊंडमधून पाणी वाहून जाणार नाही किंवा फक्त मर्यादित होईल. यामुळे जमिनीतील ओलावा सुधारण्यास आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. शहरी भागात यामुळे रस्त्यांवरील पाणी वाहून जाणे कमी होईल, त्यांचे नुकसान होईल आणि शहरी पूर टाळता येईल अशाप्रकारे स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना संदेश देऊन जलशपथ दिली. जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment