Friday 14 July 2023

अंबड येथे संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशोत्सव

 

 

जालना, दि. 14 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील अंबड येथील संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२३ - २४ प्रवेशोत्सव महोत्सव दि.13 जुलै 2023 रोजी साजरा करण्यात आला. र प्रवशोत्सवाचे प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी उदघाटन केले.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कल्याण कामगार महामंडळाच्यावतीने संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आलेले आहे. या वसतिगृहाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, ज्या पालकांकडे ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र आहे. अशा पालकांच्या पाल्यांना सहावी ते पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे तसेच आपले उचित ध्येय साध्य करण्याकडे फक्त अभ्यास करावा. तसेच चेहऱ्याच्या सौंदर्याकडे लक्ष न देता बुद्धीच्या सौंदर्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे जेणेकरून आपले उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येऊ शकेल असे प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी समाज कल्याण सहायक आयुक्त दत्तात्रय वाघ, गृहपाल संजय पवार,  संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलांचे शासकीय वसतिगृह, अंबड व श्रीमती ज्योत्स्ना गुलवाडे  उपस्थित होते. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आ ले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment