Monday 17 July 2023

राजमाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे 19 जुलैला घनसावंगी येथे आयोजन

 

 

जालना, दि. 17 (जिमाका) :- राज्यात महिला व मुलींवर होणारे क्रुर हिंसाचार व त्यातुन त्यांची केली जाणारी हत्या हे समाजासमोरील आव्हान ठरत आहे. त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. तरी युवतींना स्वसंरक्षणाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दि.20 व 21 जुलै 2023 रोजी ऑल इंडिया थांग ता असोशिएशन यांच्याद्वारे दिले जाणार आहे. त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील महाविद्यालयीन युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

शाळकरी व महाविद्यालयीन तरूण-तरूणी यांची जीवनशैली खूपच बदललेली आहे. त्यानूसार सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. त्याकरिता वयोगट 15 वर्षे व त्यापुढील तरूनींणा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग व संत रामदास महाविद्यालय घनसावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 19 जुलै 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता संत रामदास महाविद्यालय, घनसावंगी येथे महिला व मुलींवरील हिंसाचार - संकल्पना व सद्यस्थिती तसेच सायबर गुन्हेगारी व मुलींना असलेले धोके या विषयावर तज्ञाचे मार्गदर्शन होणार आहे. विशेष उपस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना  व जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे, तसेच प्रमुख मार्गदर्शिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्या योगिता होके पाटील यांची असणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment