Monday 10 July 2023

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे आवाहन जालना येथे बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; रोजगाराच्या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा


जालना दि.10 (जिमाका) :- नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्यामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, समोर, जालना येथे बुधवार दि. 12 जुलै, 2023 सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधी आयोजित करण्यात आली आहे. तरी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.

 

बुधवारी होणाऱ्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. बोरखेडी, सिंदखेड राजा रोड, जालना यांची दहावी व आयटीआय फिटर/मशिनिष्ट/ इलेक्ट्रिशियन मशिन ऑपरेटर 5 पदे, पदविका मेकॅनिकल इंजिनिअर पदवीधर (B.E./B.Tech) साठी मेन्टनस इंजिनिअर 1 पद, पदवीधर (M.B.A) एच. आर. ऑफिसर 1 पद, विनोदराय इंजिनिअरींग प्रा. लि. जालना यांची दहावी व आयटीआय वेल्डर / फिटर/मशिनिष्ट/ टर्नर मशिन ऑपरेटर 3 पदे, इंजिनिअरींग पदवी (मेकॅनिकल/ PRODUCTION) प्रोडक्शन असिस्टंट 3 पदे, दहावी व आयटीआय वेल्डर/फिटर/मशिनिष्ट/ टर्नर अप्रेंटिस 3 पदे, नव भारत फर्टिलायझर्स लि. औरंगाबाद यांची दहावी/बारावी/पदवीधर सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह 15 पदे, पदवीधर (MBA/MSW) एच. आर. एक्झिक्युटिव्ह 1 पदे, अशी एकूण 33 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे.

जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या सुवर्ण संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक लॉगिनमधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर-4 (2023-24) जालना याची निवड करावी. उद्योजक/ नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान तीन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ. कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment