Monday 17 July 2023

परतूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेवून स्वयंरोजगाराची संधी प्राप्त करण्याचे आवाहन

 

 

जालना, दि. 17 (जिमाका) :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया दि. 12 जुन 2023 पासून सुरु करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.in संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दती माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरुपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावेत. तरी आयटीआयमधून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करुन त्वरीत स्वयंरोजगार अथवा उच्च् शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परतूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रवेश प्रक्रियाच्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थामध्ये समुदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते. औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थामध्ये राज्यभरात एकुण 95 व्यवसाय उपलब्ध असून तेवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थामध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत 652 नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या करण्यात प्रस्तावित आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्था आधुनिकरण करण्यात येत आहे. आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतन वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विविध प्रवेशित उमेदवारासाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे. दहावी विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परतूर जि.जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment