Thursday 20 July 2023

स्वामी विवेकानंद विद्यालयात कायदेविषयक शिबीर संपन्न


जालना, दि. 20 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इनरव्हिल क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद विद्यालय येथे कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन मुख्याध्यापक राहुल सोनवणे,  प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती पी.पी. भारसाकडे-वाघ, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन.ए. वानखडे उप – पोस्टमास्टर, यु.पी. कुलकर्णी ,  समतादुत, बार्टी सामाजिक न्याय विभाग अनिता अशोक बोडखे, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा शिखा जी. गोयल,  ॲड. अश्विनी धन्नावत हे उपस्थित होते.

प्रास्ताविक पी.पी. भारसाकडे – वाघ यांनी केले. त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याबद्दल विस्तृतपणे विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात माहिती दिली. तसेच श्रीमती एन.ए. वानखडे यांनी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण),कायदा 2015 या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच यु.पी. कुलकर्णी यांनी भारतीय डाक विभागाच्या विविध कल्याणकारी योजना बद्दल माहिती दिली. अनिता बोडखे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची विद्यार्थ्यांना ओळख करुन दिली. श्रीमती शिखा जी. गोयल यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाबद्दल माहिती दिली. तर ॲड. अश्विनी धन्नावत यांनी बालकांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन केले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment