Tuesday 11 July 2023

घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु

 

 

जालना दि.11 (जिमाका) :- घनसावंगी तालुक्यातील बारावी उत्तीर्ण होवून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना घनसावंगी येथील अल्पसंख्यांक मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. तरी संबंधित विद्यार्थींनींनी अर्ज करावेत, असे घनसावंगी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

वसतीगृहात  सुसज्ज व सुशोभित चार मजली इमारत,  100 मुलींच्या राहण्याची उत्तम सोय,  सोलार वॉटर हिटरची व्यवस्था,  शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रत्येक विद्यार्थीनींसाठी अद्यावत फर्निचर व बेड,  अल्पसंख्यांक समाजातील मुलींना उत्पन्नाच्या अटीवरुन वसतिगृह शुल्क माफ असून आहार योजनेअंतर्गत आधार संलग्न खात्यात 3 हजार रुपये देण्याची योजना लागु आहे.  मनोरंजनासाठी टी.व्ही सुविधा व सी.सी. टि.व्ही ची सुविधा,  बिगर अल्पसंख्याक समाजातील मुलीसाठी माफक दरात राहणे व जेवण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.  प्रवेशासाठी विद्यार्थींनी घनसावंगी येथील कोणत्याही महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक महिला उमेदवारांना 70 टक्के जागा राखीव तर उर्वरित 30 टक्के जागा बिगर अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना शासकीय नियमानूसार प्रवेश देण्यात येईल. अर्ज निःशुल्क असून आवश्यक कागदपत्रासह कार्यालयात जमा करावे.

प्रचलित शासकीय आरक्षण नियमानूसार प्रवेश देण्यात येतील. दि.12 जुलै 2023 च्या प्रवेश फेरीनंतरही जागा शिल्लक राहिल्यास अर्ज करण्याची मुदत दि. 17 जुलै 2023 पर्यंत व अंतिम प्रवेश फेरी दि.19 जुलै 2023 रोजी सर्व आरक्षणानुसार व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थीनीसाठी ठेवण्यात येईल. अधिक माहितीसाठी  अधिक्षक, अल्पसंख्यांक मुलींचे शासकीय वसतीगृह, राजेगाव रोड, ता. घनसावंगी, जि. जालना. दुरध्वनी क्रं.02483-278755 किंवा  प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजेगाव रोड, ता. घनसावंगी, जि. जालना यांच्याशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment