Wednesday 5 July 2023

समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातर्फे आंतरजातीय विवाहासाठी 64.5 लाख तरतूद वाटप

 

 

जालना दि.5 (जिमाका) :- प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग औरंगाबादतर्फे विभागातील जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी यांना आर्थिक वर्ष 2023-24 साठी 64.5 लाख रुपये तरतूद वितरीत करण्यात आली आहे. वितरणात औरंगाबाद 38 लाख  रुपये, जालना 5 लाख  रुपये, बीड 16.5 लाख रुपये तर परभणी 5 लाख रुपये अशी रक्कम वाटप करण्यात आलेली असल्याची माहिती समाज कल्याण विभाग औरंगाबाद प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी दिली आहे. आंतरजातीय विवाह योजनेमध्ये वर किंवा वधु यापैकी एक जण सवर्ण हिंदू असेल आणि  दुसरा इतर जातीतील असेल तर अशा जोडप्यांना जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाकडून 50 हजार रुपये अनुदान देण्यात येते. अशा या विभागातील मागणी करण्यात आलेल्या जिल्ह्यांना आवश्यकतेनुसार तरतूद वितरण केले जात असून त्यातून जातीय दरी मिटविण्यासाठी मदत होत आहे. असे  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment