Monday 31 July 2023

विश्वस्त संस्थांनी दंडाची रक्कम धर्मादाय आयुक्त कार्यालयात 30 ऑगस्टपर्यंत भरणा करावी अन्यथा कायदेशीर कार्यवाही

 


जालना दि.31 (जिमाका) :- ज्या विश्वस्तांनी कोरोना काळात व त्यानंतर ऑनलाईन हिशोबपत्रके विलंब माफीच्या अर्जासह ऑनलाईन भरून पावत्या सादर केल्या होत्या. त्या सर्व हिशोब पत्रांना दंड आकारण्यात येवून विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. मुदतीत दंड रक्कम भरणा न करणाऱ्या संस्थाच्या सर्व विश्वस्ताविरुद्ध विश्वस्त पदावरून बडतर्फी अथवा फौजदारी खटला दाखल करणे अथवा दोन्हीही प्रकारच्या कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सहायक धर्मादाय आयुक्त विनय मेंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

संस्थेची निवडणूक घेण्यास झालेल्या विलंबाबाबत कलम 41 अ अन्वये सादर केलेल्या अर्जावर परवानगी देताना दंड आकारण्यात येवून विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. परंतु अनेक संस्थांनी सदर दंडाची रक्कम धर्मादाय आयुक्त कार्यालयात भरणा केलेली नाही. अशा विश्वस्तांनी दि. 30 ऑगस्ट 2023 पर्यंत दंडाची रक्कम धर्मादाय आयुक्त कार्यालयात भरणा करून पावती घ्यावी, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment