Wednesday 26 July 2023

जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायद्याविषयी जनजागृती

 


जालना, दि. 26 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य  उत्पादने प्रतिबंध कायदा 2003 बाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठवाडा ग्रामीण संस्थेचे विभागीय अधिकारी अभिजित संगई, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा‍ सल्लागार डॉ.संदिप गोरे यांची होती.  

यावेळी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास कार्यालयात प्रतिबंध घालण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी यावेळी नमूद केले. तर प्रमुख वक्ते विभागीय अधिकारी अभिजित संगई यांनी सिगारेट व तंबाखूजन्य  उत्पादने प्रतिबंध कायद्याबाबत सविस्तर माहिती देवून जनजागृती केली. यावेळी डॉ.गोरे यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यास त्याचे मानवी शरीरावर काय परिणाम होतात याची माहिती देवून न्यायालयाचे कर्मचारी व पक्षकारांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास वरिष्ठांनी प्रतिबंध करावा असे सांगितले. यावेळी श्री.संगई यांनी उपस्थितांना तंबाखू सेवन विरोधी शपथ दिली.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment