Monday 24 July 2023

पिक विमा योजनेची जिल्ह्यात 5 वाहनांद्वारे जनजागृती; जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दाखविली हिरवी झेंडी



 

जालना, दि. 21 (जिमाका):-  प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्यात सर्व समावेशक पिक विमा योजना खरीप हंगाम सन  2023-24 राबविण्यात येत  असून जिल्ह्यामध्ये ही योजना युनिव्हर्सल सोंम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत राबविण्यात येत आहे. एक रुपयामध्ये पिक विमा योजनेची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी फलकावर माहितीसह ध्वनी संदेश लावून तयार करण्यात आलेल्या 5 जनजागृतीपर वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी आज हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणाले की, सर्व शेतकऱ्यांना यावर्षीपासून केवळ एका रुपयात पिक विमा योजनेचा लाभ देण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांनी यात सहभागी होवून आपल्या पिकांना संरक्षित करावे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेची एकुण 5 वाहनाद्वारे जिल्ह्यातील विविध मंडळात जावून पुढील जवळपास 10 दिवस प्रसिध्दी केली जाणार आहे. पिक विम्याचा लाभ केवळ एक रुपयात दिला जात असून अतिरिक्त पैशाची मागणी करणाऱ्या केंद्र चालकांविरुध्द तक्रार प्राप्त होताच त्यावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. आजपर्यंत जिल्ह्यात जवळपास 7 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून उर्वरित शेतकऱ्यांनी पिक विमा भरावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment