Wednesday 5 July 2023

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी आवाहन

 


 

      जालना दि.5 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांमार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एस.एस. इंग्लिश स्कुल बदनापुर व जालना तालुक्यातील गुरुदेव इंग्लिश स्कुल भिलपुरी  या शाळेची निवड केली आहे. जिल्ह्यातील धनगर व त्यांच्या उपजाती मधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

               शासनाने वेळोवेळी घोषीत केलेल्या सर्व सोयी-सुविधा मोफत उपलब्ध असून या शाळेत या योजनेंतर्गत अर्ज तात्काळ करणे आवश्यक आहे.  प्रवेश घेण्यासाठी  मान्यता मिळालेल्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे किंवा सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयांकडे  भेट देऊन अर्ज उपलब्ध करुन घ्यावेत. प्रवेश घेण्यासाठी प्रवेशित विद्यार्थी हा धनगर व त्यांच्या उपजाती मधील असावा व त्याबाबतचे जात प्रमाणपत्र असावे. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 1 ते 5 वी वर्गात प्रवेशित असावा. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतल्यास जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे. पालकाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांच्या मर्यादेत व मागील आर्थिक वर्षामधील असणे आवश्यक आहे. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment