Thursday 28 July 2022

"घरोघरी तिरंगा" उपक्रमातंर्गत तिरंगा झेंडा विक्री केंद्राचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते शुभारंभ - जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा झेंडा विक्री केंद्र

 



जालना, दि. 28 (जिमाका) :-  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  नागरिकांना योग्य दरामध्ये झेंडा विकत घेता यावा यादृष्टीने जिल्हाभरात झेंडा विक्री केंद्र सुरु करण्यात येत असुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरु करण्यात आलेल्या तिरंगा झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आला.

            यावेळी मानव विकासाचे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, अग्रणी बँकेचे अधिकारी प्रेषित मोघे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक उमेश कहाते, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, उपजिविका विकास अधिकारी प्रविण काथे, लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती मिनाक्षी घायाळ, छाया निकाळजे आदींची उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरु करण्यात आलेले झेंडा विक्री  केंद्र हे सुट्टीचे दिवस वगळता सकाळी 10.00 ते सायं. 6.00 या वेळेत सुरु राहणार असुन प्रती झेंडा 30 रुपये एवढी किंमती असणार आहे. जालना जिल्ह्यातील नागरिकांनी दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत आपल्या घरावर तसेच प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या कार्यालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकवून या महोत्सवात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी केले.

-*-*-*-*-*-

अनूसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात मोफत प्रवेश सुरू

 


जालना दि. 28 (जिमाका) :- महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग मार्फत अनूसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह प्रवेश योजना प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद अंर्तगत येणा-या औरंगाबाद, जालना, बीड व लातूर या चार जिल्हयातील 14 वसतिगृहामध्ये प्रवेशाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी - विद्यार्थीनींना तालुका स्तरावर इयत्ता 8 वी पासून पुढील प्रवेशाकरिता व जिल्हा स्तरावर इयत्ता 11 वी पासून नंतरच्या शिक्षणाकरीता शासकीय वसतिगृह प्रवेश योजना पात्र विद्यार्थ्यांकरिता शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

   सन 2022 -2023 करिता पालकाचे घोषणापत्र व विद्याथ्र्यांचे घोषणापत्र नमुना आणि विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना खालील लिकंमध्ये देण्यात आलेल्या सुचनांची खबरदारी घेण्यात यावी https://drive.google.com /file/d/1u WMTN0 ARcXZZ15 qqUaokCL3U RmfqU6e/view?usp=sharing

      वसतिगृह प्रवेशासाठी संकेत सुरू करण्यात आलेले असुन विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर अर्ज भरल्यानंतर संबंधित गृहप्रमुख, गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. तथा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या वसतिगृहात प्रवेश घेण्याबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद) देवकन्या बोकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिलेआहे.

-*-*-*-*-*-

सहकार न्यायालयात 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

 


 

     जालना दि. 28 (जिमाका) :- राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सहकार न्यायालय, औरंगाबाद येथे दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले आहे, या लोकअदालतीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,नागरी सहकारी बँका,नागरी,ग्रामीण सहकारी पतसंस्था,महाराष्ट्र स्टेट को-ऑप हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन यांच्याकडील  प्रि – लिटिगेशन (Pre-litigation) टप्प्यांवरील दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,नागरी सहकारी बँका,नागरी,ग्रामीण सहकारी पतसंस्था,महाराष्ट्र स्टेट को-ऑप हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन यांच्याकडील प्रि – लिटिगेशन टप्प्यांवरील दावे सहकार न्यायालयात लोक अदालतीच्या माध्यमातून तडजोडीद्वारे निकाली काढण्यात येणार असल्याने वरील प्रमाणे प्रि – लिटिगेशन टप्प्यांवरील दावे नागरी संस्थांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना यांच्या कार्यालयात दाखल करण्याबाबत करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन खालील संस्थांनी या कार्यालयाकडे खालीलप्रमाणे दाव्यांची यादी दाखल केलेली आहे.

समर्थ नागरी सहकारी बँक मर्या. जालना, शाखा- रामनगर- 14, पद्मशाली नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जालना – 17, दि महाराष्ट्र स्टेट को - ऑप हाऊसिंग कार्पोरेशन लि. जालना- 4

दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी लोक अदालत होणार असल्याने त्यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागरी सहकारी बँका,नागरी,ग्रामीण सहकारी पतसंस्था, महाराष्ट्र स्टेट को-ऑप हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन यांचेकडील प्रि – लिटिगेशन टप्प्यांवरील दावे असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना यांच्या कार्यालयात  सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

डाक जीवन विमा एजंटची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया

 


 

      जालना दि. 28 (जिमाका) :- औरंगाबाद डाक विभागात डाक जीवन विमा,ग्रामीण डाक जीवन विमा एजंट थेट मुलाखतीद्वारे नेमणे आहेत. त्यासाठी आवश्यक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

            वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष शैक्षणिक पात्रता अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण अथवा केंद्र, राज्य सरकार मान्यता प्राप्त समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

    श्रेणी – सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, माजी जीवन विमा सल्लागार, इतर विमा कंपन्याचे माजी अभिकर्ते, स्वयंरोजगार वा उपरोक्त पात्रता असलेले इच्छुक.

    उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल. व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विम्या बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती इत्यादीबाबी आवश्यक.

      निवड झालेल्या उमेदवारास रुपये 5 हजारची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक जी की राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र स्वरुपात असेल.

    प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागातून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल, जो आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल.

   सर्व इच्छुकांनी अधीक्षक, डाकघर, औरंगाबाद विभाग, जुना बाजार, औरंगाबाद – 431001 यांचे कार्यालयात जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची एक साक्षांकित प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्र तसेच खालील नमुन्यातील अर्जासह दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. नियुक्ती ही लायसन्स तसेच कमिशन तत्त्वावर असेल.  अशी माहिती अधीक्षक डाकघर औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.   

-*-*-*-*-*-

33 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्ह्यात 16 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


                जालना दि. 28 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  33 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात –  जालना शहर -5, मालेगाव -1, मंठा तालुक्यातील  - निरंक, परतुर  तालुक्यातील –निरंक, घनसावंगी तालुक्यातील निरंक, अंबड तालुक्यातील – अंबड शहर -5, पारनेर -1, दहिपुरी -1, बनटाकळी -1, बोरी -1, बदनापुर  तालुक्यातील – पिरसावंगी -1,जाफ्राबाद तालुक्यातील –निरंक, भोकरदन तालुक्यातील – निरंक, इतर जिल्ह्यातील – निरंक,अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 16 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 16 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

              जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 73164 असुन  सध्या रुग्णालयात- 02 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14272  दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 563 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-828550 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -16, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 68406 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 756072 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1194, एकुण प्रलंबित नमुने-00, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -541719

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 00,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-13252 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -02, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00 दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-33, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 67098,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-95 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1260464 मृतांची संख्या-1213

        जिल्ह्यात 00  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

16

68406

डिस्चार्ज

33

67098

मृत्यु

0

1213

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

835

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

378

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

439

512162

पॉझिटिव्ह

16

56880

पॉझिटिव्हीटी रेट

3.6

11.11

रॅपीड अँटीजेन टेस्ट

124

316526

पॉझिटिव्ह

0

11526

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

3.64

एकुण टेस्ट

563

828688

पॉझिटिव्ह

16

68406

पॉझिटिव्ह रेट

2.84

8.25

क.      कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

135356

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

73162

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

93

 होम क्वारंटाईन      

93

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

1260464

हाय रिस्क  

382437

लो रिस्क   

878027

 रिकव्हरी रेट

 

98.09

मृत्युदर

 

1.77

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

अधिग्रहित बेड

2

 

उपलब्ध बेड

4658

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

अधिग्रहित बेड

1

 

उपलब्ध बेड

954

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

अधिग्रहित बेड

1

 

उपलब्ध बेड

1848

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

462

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

1888

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

179

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

अधिग्रहित बेड

0

 

उपलब्ध बेड

1856

 

3571

-*-*-*-*-*-*-