Tuesday 5 July 2022

बकरी ईद निमित्ताने पशुसंवर्धन विभागाकडून सुचना निर्गमित


जालना दि. 5 (जिमाका) :-   दि.10 जुलै 2022 रोजी बकरी ईद असल्याने दि. 9 जुलै  ते 11 जुलै 2022 या कालावधीत जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल  होते.  राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायदा लागु करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यात आली असल्याने गाई, वळु व बैल यांच्या कत्तलीस मनाई आहे. तसेच राज्यात गाय, वळु व बैलाच्या कत्तलीच्या प्रयोजनासाठी वाहतूक निर्यात, खरेदी-विक्री तसेच गोवंशाचे मांस बाळगण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.

            महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायद्यानुसार जालना जिल्ह्यात जनावराची कत्तल पुर्व तपासणीसाठी 31 सक्षम अधिकाऱ्यांची नेमणुक केलेली करण्यात आलेली असुन सुधारीत कायद्यानुसार अनुसुचीत प्राणी म्हशी व म्हशीचे पारडे यांची कत्तलपुर्व तपासणी  करण्यात येईल. कायद्यातील अनुसुचीत जनावरे योग्य कारणे देऊन प्रमाणपत्रे देण्यात येतील.

        प्राणी रक्षण कायद्याचे उल्लंघन केल्यास कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र ठरतील याची नोंद घ्यावी, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment