Friday 22 July 2022

महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना व महाग्रामीण राहत योजना एकरकमी कर्ज परतफेड योजना

 


            जालना दि. 22 (जिमाका) :-  जिल्ह्यामध्ये सदस्थितीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने पीक कर्ज नुतनीकरण सुरु आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या थकबाकीदार झालेल्या शेतक-यांना बँकेच्या वतीने महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना(एमबीटीवाय) व महाग्रामीण राहत योजना (एमजीआरवाय) एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु आहेत.

महाग्रामीण बळीराजा तारणहार योजनेतील लाभार्थ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध असुन थकबाकीदार शेतक-यांनी पीककर्ज नुतनीकरण केल्यास पात्र शेतक-यांना वाढीव कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे.

तरी जिल्हयातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या थकबाकीदार शेतक-यांनी वरील योजनेचा लाभ घेऊन त्यांचेकडील थकीत रकमेची परतफेड करण्यासाठी बँकेच्या संबंधित शाखेस भेट दयावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment