Friday 22 July 2022

दिव्यांग संशोधन समितीच्या पुर्नगठणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


 

                      जालना दि. 22 (जिमाका) :-  दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनीयम 2016 च्या कलम 66 उपकलम 2 (ई) नुसार राज्य सल्लागार मंडळ तसेच अधिनियमातील कलम 6 (2) नुसार दिव्यांग संशोधन समितीचे पुर्नगठण करण्यासाठी जिल्हयातील दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत व नामवंत तज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगाच्या स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग प्रतिनिधी व सदस्य यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. हे प्रस्ताव आयुक्त, दिव्यांग कल्याण पुणे यांना सादर करावयाचे असल्याने दिव्यांग क्षेत्रात केलेल्या कार्याच्या संपूर्ण अहवालाचा प्रस्ताव बातमी प्रसिद्धी झाल्यापासुन तीन दिवसात जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद जालना येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment