Monday 25 July 2022

 




स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने वृक्षारोप

जालना दि. 25 (जिमाका) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्ताने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि लक्ष्मी कॉटस्पीन लिमिटेड, सामनगांव यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी कॉटस्पीन लिमिटेड यांच्या आवारात दिनांक 25 जूलै, 2022 रोजी कौशल्य प्रशिक्षणार्थींच्या सहाय्याने एकुण 75 वृक्षांचे  वृक्षारोप करण्यात आले.

 

या प्रसंगी सहायक आयुक्त संपत चाटे यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरणामध्ये वृक्षांचे महत्व विषद करताना निर्सगावर मोठ्या प्रमाणात केलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, अतिवृष्टी या सारख्या नैसर्गिक आपत्तींना वारंवार सर्व जगास सामोरे जावे लागत आहे. लक्ष्मी कॉटस्पीन लिमिटेड, येथे वृक्षारोप करण्यात आलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणेसाठी सामाजिक बांधीलकी समजून प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांने एका वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी. तसेच दैनंदिन जीवन जगत असताना पर्यावरण पुरक जीवनशैली स्विकारावी असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, संपत चाटे, यांनी उपस्थितांना आवाहन केले.

 

यावेळी सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना, संपत चाटे, संजयजी राठी, कार्यकारी संचालक, लक्ष्मी कॉटस्पीन लिमिटेड, सामनगांव तसेच किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2021-2022 अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी यांच्या हस्ते एकुण 75 वृक्षांचे वृक्षारोप करण्यात आले. तदनंतर  प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना मोफत टि-शर्ट चे वाटप करण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे संचलन  कंपनी व्यवस्थापक प्रा.एस.आर.जवळकर यांनी केले आणि सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सुरेश बहुरे, कैलास काळे, आत्‍माराम दळवी, प्रदीप डोळे आणि लक्ष्मी कॉटस्पीन लिमिटेड येथील अधिकारी व कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.  अशी माहिती सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संपत चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment