Tuesday 19 July 2022

बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुलभ पीक कर्ज नुतनीकरण योजना शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 


जालना दि. 19 (जिमाका) :-जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण,सहकारी बँकांची प्रत्येक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप पीक कर्ज वाटपाचे अनुषंगाने आढावा सभा घेण्यात येत असुन नुकत्याच जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा सभेत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक (बँक ऑफ महाराष्ट्र) तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे सभेसाठी उपस्थित असलेल्या शाखाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या संलग्न असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांसाठी बँकेने सुलभ पीक कर्ज नुतनीकरण योजना कार्यान्वित केली असून या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचे नुतनीकरण करण्यात येऊन रुपये 50 हजार चे मर्यादेत नव्याने तात्काळ कर्ज देण्यात येत असल्याचे सांगितले आहे. या योजनेचा लाभ बँक ऑफ महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील सुमारे 7 हजार 500 कर्जदार शेतकऱ्यांना होणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांना संलग्न असलेल्या गावातील पात्र शेतकऱ्यांनी बँकेच्या संबंधित शाखेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment