Thursday 14 July 2022

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 ई-पिक पाहणी अंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी पिकांची नोंद करावी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन

 


 

जालना दि. 14 (जिमाका):-   खरीप-2022 व रब्बी हंगाम 2022-23 साठी राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना Cup and Cap Model (80:110) नुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक(Area Approach) धरून कृषि व पदुम विभागानुसार राबविण्यात येत आहे. या ई-पीक पहाणीमध्ये जिल्ह्यातील    

 सर्व शेतकऱ्यांनी पिकांची नोंद करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

शेतकरी पिक पेरणीबाबत स्वयंघोषणा पत्र देऊन विमा योजनेत सहभाग घेतात. पण प्रत्यक्ष शेतात पेरलेले पिक वेगळे असू शकते. शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या पिकाचाच पिकविमा घेणे आवश्यक आहे. विमा घेतलेले पीक शेतकऱ्यांनी शेतात पेरले नसल्यास शेतकऱ्याचा विमा हप्ता बाद केला जातो व त्याने भरलेला विमा हप्ता जप्त केला जातो. शेतकऱ्यास नुकसान भरपाईचा कोणताही दावा मिळत नाही. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकासंदर्भात त्यांनी चालू हंगामात ई-पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद वेळेत ई-पिक पाहणीमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एस.रणदिवे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment